Thursday, August 15, 2019

स्वातंत्र्य दिनी ग्रंथ वाचन चळवळीस ग्रंथभेट

स्वातंत्र्य दिनी ग्रंथ वाचन चळवळीस ग्रंथभेट
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथिल बलीदान-एम.एस.धोनी फाऊंडेश च्यावतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रंथ वाचन चळवळीस पुस्तकांची भेट देण्यात आली. एम.निलंगे यांच्या निवासस्थानी झालेल्या ग्रंथदान समारंभात ग्रंथ वाचन चळवळीचे मार्गदर्शक तथा श्री महालिंगेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम.एस.निलंगे, सदस्य एन.एम.निळे यांनी सदरील भेट स्विकारली. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश खेडकर, सदस्य सुमीत डाके, सुयोग देशमुख, सिध्दांत काळे, आदींसह पत्रकार किरण स्वामी, राम मनोहर टोपारे (निलंगे सरांचे जावाई) यांची उपस्थिती होती.भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त ग्रंथ वाचन चळवळीस पुस्तकांची भेट दिल्याबद्दल चळवळीच्या वतीने ग्रंथदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. चळवळीच्या वतीने ग्रंथदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment