Thursday, August 15, 2019

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परभणी दौरा कहि खुशी कहि गम

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परभणी दौरा कहि खुशी कहि गम
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परभणी दौरा फायनल झालाय. 28 ऑगस्ट रोजी सेलू पाथरी मानवत परभणी अशा ठिकाणी फडणवीस यांची यात्रा पोहोचते आहे.देवेंद्र फडणवीस यांचा परभणी येथे मुक्काम आहे. विशेष म्हणजे ते कोणत्याही नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या घरी जाणार नाहीत कोणत्याही हॉटेलला थांबणार नाहीत तर शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम राहणार असल्याचे सांगितले जाते. म्हणुन कहि खुशी कहि गम असे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे आपल्या निवासस्थानी घेऊन मुख्यमंत्र्यांनी चहापान करावे जमले तर भोजनही करावे असा अनेकांनी प्रयत्न करून पाहिला. परंतु मुख्यमंत्र्यांनी यात्रेचे स्वरूप लक्षात घेता कोणत्याही नेत्याच्या घरी न जाण्याचा निर्णय घेतला....।।
भारतीय जनता पक्षाला परभणी जिल्ह्यात बळ देण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरेल. प्रामुख्याने पाथरी परभणी जिंतूर आणि गंगाखेड या चार विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असले तरी अद्यापर्यंत गंगाखेड मतदार संघातील एका विजयानंतर कोणत्याही विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला तेवढेच महत्त्व प्राप्त झाले असून भारतीय जनता पक्षाचे कोणते उमेदवार सरस ठरते. याचा आढावा या यात्रेच्या निमित्ताने करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वास्तविक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती असली तरीदेखील परभणी पाथरी गंगाखेड आणि जिंतूर या चारही विधानसभा मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवारांची मोठी यादी आहे. प्रत्येकाला ही संधी निर्माण झाली आहे. परंतु या संधीचे सोने कोण करते यावरही बरेच काही अवलंबून आहे.आता नाही तर कधीच नाही या वाक्या नुसार इच्छुक उमेदवारांनी आपली फिल्डिंग जोरात लावली परंतु नशिब आणि प्रयत्न कोणाच्या बाजूला सरस ठरतील हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरेल. पाथरी विधानसभा मतदार संघात अपक्ष आमदार मोहन फड यांचे नाव चर्चेत आहे फड यांच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षातील मानवत अनंत गोलाईत, सोनपेठ शिवाजी मव्हाळे अशी नावे चर्चेत आहेत तर माजी जील्हा अध्यक्ष पी.डी.पाटिल यांनी मा.ना.नितीन गडकरी यांच्या कडे तिकिटाची मागणी केलेली आहे असे बोलल्या जाते. परंतु फड हे अपक्ष म्हणून लढतात की भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारतात याचा अद्याप उलगडा झाला नाही, जिंतूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर त्यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांच्यासह काही नावे समोर येत आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघात महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांचे नाव आघाडीवर आहे भरोसे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राहुल पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी भरोसे यांनी प्रयत्न जारी केले आहेत.गंगाखेड विधानसभा मतदारसंघात अनेक नावे समोर आली असून माजी आमदार विजयराव गव्हाणे, गणेश राव रोकडे, रामप्रभू मुंढे, डाँ.सुभाष कदम यांच्या शिवाय अनेक नावे चर्चिली जात आहेत.अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाची परभणी जिल्ह्यातील वाढलेली ताकद लक्षात घेता आणि सरकारचे निर्णय या जमेच्या बाजू असल्या तरी इच्छुक उमेदवारांनी कशा पद्धतीने प्रचाराची आखणी केली हे महत्त्वाचे ठरेल.भारतीय जनता पक्षाला मोठी संधी चालून आली आहे.परंतु सहयोगी पक्षाला देखील तेवढीच मदत करावी लागणार आहे.भारतीय जनता पक्षाला कोणत्या ठिकाणी उमेदवार देता येईल आणि निवडून आणता येईल याची चाचपणी देखील यात्रेत होईल मुख्यमंत्री फडणवीस स्वतः विधानसभानिहाय अधिक माहिती घेतील आणि त्यावर निर्णय होईल असे सांगितले जाते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल का हाही प्रश्न महत्त्वाचा ठरेल. युती नाही झाली तर चारही विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचे यावरही खलबते होऊ शकतात. एकंदरीतच सेलू पाथरी आणि परभणी येथील होत असलेल्या जाहीर सभा महत्त्वाच्या ठरू शकतात.या सभांना कितपत प्रतिसाद मिळतो या सभेतून नेमक्या कोणत्या समस्या सोडवल्या जातात.यावरही बरेच काही अवलंबून आहे.

No comments:

Post a Comment