पदवी प्रथम वर्षातील विध्यार्थ्यांचे आय.क्यु.ए.सी.च्या वतिने स्वागत
सोनपेठ (दर्शन) :- कै.र.व.महाविद्यालय येथे पदवी प्रथम वर्षातील विध्यार्थ्यांचे आय.क्यु.ए.सी.च्या वतिने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील हे होते.
शहरातील कै.र.व.महाविद्यालयाच्या पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन आय.क्यु.ए.सी. च्या वतीने करण्यात आले होते.यावेळी प्राचार्य डाॕ.वसंत सातपुते यांनी नविन प्रवेशित विद्यार्थ्यांना सुरेख हसत खेळत मार्गदर्शन करत त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सुचना केल्या. महाविद्यालयाची संक्षिप्त ओळख करून देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांनी केला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रज्ञा विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये यांना पी एच्. डी. मिळाल्याबद्दल सत्कार व विविध प्राविण्याबद्दल प्राध्यापक व विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय. क्यु. ए. सी.समन्वयक मुकुंदराज पाटील यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी यांनी केले.स्वागत गित नेहा किरवले हिने गाईले.याप्रसंगी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment