मुख्याधिकारी मा.सोनम देशमुख रुजू
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील नगरपरिषद कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात दि.30 जुलै 2019 मंगळवार रोजी नुतण मुख्याधिकारी म्हनुण जळकोट नगर परीषदेच्या मा. सोनम देशमुख यांचे स्वागत नगरअध्यक्षा सौ.जीजाबाई राठोड यांनी केले.याप्रसंगी प्रभारी मुकाधिकारी देवदास जाधव यांना निरोप देण्यात आला.यावेळी सत्ताधारी व विरोधी सर्व नगरसेवक मोठ्या संखेने उपस्थित होते.मा.सोनम देशमुख यांनी दि.1आँगस्ट 2019 बुधवार रोजी आठवडी बाजारात सर्व कर्मचारी वर्ग सोबत घेऊन पाहणी करत, प्लास्टिक पिशवी तपासणी, स्वछतेच्या बाबत सुचना करुन पाहणी केली, न.प.चे शाँपींग सेंटरची हि पाहणी केली.यावेळी व्यापारी वर्गातुन स्वछताग्रहाची मागणी चर्चेतुन सा.सोनपेठ दर्शन प्रतिनीधी जवळ बोलताना व्यक्त केली.मुतारीची सोय हि आठवडी बाजारात नसल्यामुळे व्यापारी वर्गातुन संताप नेहमीच व्यक्य केल्या जातो.न.प.च्या ध्वज-स्थबाजवळ झेंडा वंदनास आगणवाडी ताई व आगणवाडीतली मुल / मुली बसवतात त्या ठिकाणी रोगराईस आमंत्रण दिल्या जाते.मा.सोनम देशमुख व्यापारी वर्गाचीच नाहि तर शहरातील डाँक्टर, प्राध्यापक, शिक्षक, वकील, पत्रकार व सामान्य नागरीकांनी मुत्रनिसारण कोठे करावे हा तोंड दाबुन बुक्क्याचा मार आज पर्यंत सहन करत आले आहेत.हि परवड कधी थाबेल असा प्रश्न या माध्यमातून जनता जनार्धन विचारत आहे.
No comments:
Post a Comment