सर्व समाजातील वंचित घटकाला निराधार समितीकडुन न्याय देण्याचे काम करील - शिवाजीराव मव्हाळे
सोनपेठ (दर्शन) :- परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांना परभणी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभयजी चाटे यांच्या शिफारशी वरून येथील प्रलंबित सोनपेठ तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी नुकतीच मा.जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र शिवाजीराव मव्हाळे यांना मिळाले त्याबद्दल प्रस्तुत सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की सर्व समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचे काम करील या आधी मला संधी दिली होती त्याचं सोनं केलं व आता ही निराधार, विधवा, अपंग व वयोवृध्द ज्येष्ठ नागरिक आदींना नियमित बैठका घेऊन सोनपेठ तालुक्यातून जास्तीत जास्त दाखल अर्जांना मंजूरी देण्याचे काम करणार आहे. शहरी असो वा ग्रामीण दाखल अर्जावर तालुक्याची लवकरात लवकर बैठक बोलावून दाखल अर्जावर त्वरित निर्णय घेण्यासाठी सदस्य सचिव मा.तहसीलदार यांची भेट घेणार असून बैठक बोलावणार आहे तरी सोनपेठ तालुक्यातील विना त्रुटी निराधार, विधवा, अपंग व वयोवृध्द ज्येष्ठ नागरिक आदींनी शासनाच्या या विवीध योजनेत तात्काळ अर्ज दाखल करावेत असे अवाहन करतो.या निवडी बद्दल भाजपा ग्रामिण जील्हा अध्यक्ष अभयजी चाटे, जील्हा कार्यकारीनी सर्व सदस्य, सर्व भाजपा तालुका कार्यकारीनी सदस्य, मित्र परीवार, हितचींतक, मराठी पत्रकार परीषद तालुका संघ सर्व पत्रकार सदस्य, सा.सोनपेठ दर्शन संपादक सर्व पत्रकार, कै.राजकुमार मव्हाळे ग्रामिण विकास सेवाभावी संस्था सर्व संचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment