सोनपेठ रोटरी क्लब च्या वतीने पूरग्रस्थांसाठी मदत फेरीतुन 61607 रुपये जमा
सोनपेठ (दर्शन) :-
रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय संस्था असुन रोटरी क्लब द्वारे भारताला पोलियो मुक्त करण्यासाठि सिंहाचा वाटा असुन अनेक नैसर्गिक आपत्तीत भुकंप असो वा पुरग्रस्थ असो वा अनेक आरोग्य शिबीरातुन अनेक गाव दत्तक घेऊन सर्व सदस्य स्वताः वेळ व पैसा देऊन मौलाचे कार्य करत असतात असेच सोनपेठ रोटरी क्लब च्या वतीने दि.14 अॉगस्ट 2019 बुधवार रोजी सांगली-कोल्हापूर पूरग्रस्थांसाठी मदत फेरी काढण्यात आली. सदरील फेरीमध्ये रोटरी क्लब अध्यक्ष रो.किरण चौलवार, सचिव रो.बालमुकुंद सारडा, एजी रो.चंद्रकांत लोमटे, डीसी रो.संजय आढे, माजी आमदार रो.व्यंकटराव कदम साहेब, माजी न.प.उपाध्यक्ष रो.सुहासदादा काळे, प्रतीष्ठीत व्यापारी रो.घनःशामदास झंवर, रो.संजय काबरा, रो.प्रमोद गावरस्कर, रो.गीरीष गावरस्कर, रो.गजानन घोडे, रो.केदार वलसेटवार, रो.सुभाषअप्पा नित्रुडकर, केमिस्ट ड्रगीस्ट असोसियनचे तालुका अध्यक्ष रो.संतोषअप्पा निर्मळे, सोनपेठ इंण्डेनचे रो.संजय राख, रो.भगवान मस्के, रो.डॉ.बालाजी पारसेवार, रो.प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, मुख्याध्यापक रो.प्रदिप गायकवाड, रो.इंजी.नागनाथ सातभाई, सोनपेठ दर्शन चे संपादक किरण स्वामी, रो.प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये, रो.अनिल शेटे, रो.संजय ईंदुरकर, नागनाथ कोटुळे, बाबा कदम व रोटरॕक्ट क्लबचे विद्यार्थी मिळून शहरातुन मदत फेरी काढण्यात आली. सदरील मदत फेरीमध्ये सर्वच व्यापारी, डॉक्टर्स, कर्मचारी, राजकारणी, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, गाडेवाले, फेरीवाले, छोटे व्यापारी आणि विशेषतः हातावर पोट असणारे अत्यंत गरीब लोक जसे कि बुटपॉलीश करणारे, हमाल, गाडेवाले, फेरीवाले, स्वच्छता कामगार, महिला भगीनी व सोनपेठमध्ये पायी चालणाऱ्या लोकांनी मोठ्या आस्थेने पुरग्रस्तांसाठी मदत करुन पूरग्रस्तांप्रती आपली आस्था व्यक्त केली. या मदत फेरीमध्ये शहरातून रुपये 45,107 /- (पंचेचाळीस हजार एकशे सात रुपये) आणि रोटरी क्लब सोनपेठ सर्व सदस्य प्रत्येकी रु.500/- प्रमाणे 16,500/ (सोळा हजार पाचशे) असे एकूण रुपये 61,607 /- (एकसष्ट हजार सहाशे सात रुपये ) जमा झाले. सदरील जमलेला निधी त्वरीत रोटरी क्लब सोनपेठ च्या बँक खात्याद्वारे वर पाठवून देण्यात आला.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment