भाजपाच्या वतीने सदस्य नोंदणीस प्रारंभ ; सोनपेठ तालुक्यात विक्रमी पल्ला गाठणार:- शिवाजी मव्हाळे
सोनपेठ (दर्शन) :- भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या कार्यकाळात सरकारच्या माध्यमातून जनउपयोगी आणि लोकोपयोगी सुधारणा करून सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम चालू आहे.त्याचबरोबर ग्रामीण भागासोबतच शहरातील विकास कामांनी मोठ्या प्रमाणात पल्ला गाठलेला असून पुढील सरकारमध्येही कामे होणारच आहेत.या आत्मविश्वासासह सोनपेठ तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या नवीन सदस्यत्वाची विक्रमी नोंदणी करणार असल्याचे सुतोवाच भाजपाचे जिल्हाचिटणीस तथा राजकुमार मव्हाळे ग्रामीण प्रतिष्ठानचे शिवाजी मव्हाळे यांनी केले.यावेळी पुढे बोलताना मव्हाळे म्हणाले की, शासनाच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्ही सरकारनी मिळून 221 योजना तयार करून त्या योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे काम केले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचे यश पक्षाला मिळाले आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीतही मित्रपक्षासह स्वबळावर भाजपा सत्तेत येईल.यात दुमत नसल्याचे त्यांनी सांगत सोनपेठ तालुका म्हणजे विरोधी पक्षाचा बालेकिल्ला आहे. तो बालेकिल्ला मोडून काढण्यासाठी सोनपेठचे सर्व भाजपाचे पदाधिकारी कामाला लागले असून आता पक्षाने नवीन सदस्यता नोंदणी चालू केली आहे मागील आठ दिवसा पासून नोंदणी करत असताना ग्रामीण भागातील वाडी-तांड्यावर जाऊन भाजपाच्या सदस्य होण्यासाठी लागणारी माहिती लोक स्वतःफॉर्मवर भरून देत आहेत. हा प्रतिसाद मिळत असल्याने सोनपेठ तालुका भाजपा मध्ये उत्साह संचारला असून आगामी काळाच्या अनुषंगाने सदस्यत्वपदाचा पल्ला गाठून नवीन सदस्यत्व नोंदणी करण्याचा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.सोनपेठ शहरातील विविध भागात फिरून शासनाच्या योजना विषयी विचारण्याचं काम सोनपेठ भाजपाचे पदाधिकारी करत आहेत.या पदाधिकाऱ्यां मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते रमाकांत जहागीरदार, जिल्हाचिटणीस शिवाजी मव्हाळे, भाजपा तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडी, यांच्यासह सर्व बूथप्रमुखांची मोठ्या संखेने सहभाग घेत आहेत.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment