मराठी पत्रकार परिषदेच्या नांदेड अधिवेशनासाठी परभणी जिल्हयातून 300 पत्रकार सहभागी होणार
परभणी / सोनपेठ (दर्शन) : - नांदेड येथे 17 व 18 ऑगस्ट रोजी होणार्या मराठी पत्रकार परिषदेच्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी परभणी जिल्हयातून 300 पत्रकार सहभागी होणार असल्याची माहिती परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी दिली आहे.
या संदर्भात आज परभणी जिल्हा पत्रकार संघाची एक बैठक परभणीत घेण्यात आली. त्यात नांदेड येथे होणार्या अधिवेशनासाठी पूर्वतयारीची चर्चा करण्यात आली. परभणी जिल्हा पत्रकार संघाला सलग्न असलेल्या नऊ तालुका तसेच तीन ग्रामीण तालुका असे एकूण 12 तालुकाध्यक्षांना यापूर्वीच संपर्क करून पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला जाणार्या पत्रकारांची यादी मागवण्यात आली. जवळपास प्रत्येक तालुक्यातून 20 पेक्षा जास्त ग्रामीण पत्रकार या अधिवेशनात सहभागी होणार असल्याचे जिल्हा कार्यालयास यादी प्राप्त झाली आहे. नांदेड येथील निवास व्यवस्थेवर ताण येऊ नये म्हणून नांदेड-परभणी अंतर कमी असल्याने शेजारी असणार्या तालुक्यातून पत्रकार दोन दिवस ये-जा करणार आहेत. परभणी शहरातील पत्रकारांनी देखील आज या संदर्भात पूर्व तयारीची उजळणी केली. नांदेडचे अधिवेशन भव्य-दिव्य करण्याच्या दृष्टीने तसेच नांदेड जिल्हा पत्रकार संघ संयोजकांना सहकार्य करण्याचे सर्वांनूमते निर्णय घेण्यात आला. परभणी जिल्हयातील सर्व दैनिकांचे पत्रकार सहभागी होत असतांना जिल्हयातील जेष्ठ पत्रकारांनाही निमंत्रीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच जिल्हयातून प्रसिध्द होणार्या साप्ताहिक, पाक्षीकांच्या संपादक व पत्रकारांनाही या अधिवेशनात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, कार्याध्यक्ष सुरज कदम, प्रदेश प्रतिनिधी राजू हट्टेकर, सरचिटणीस लक्ष्मण मानोलीकर, सोशल मिडियाचे जिल्हा समन्वयेक प्रभू दिपके, माजी जिल्हाध्यक्ष प्रविण देशपांडे, जेष्ठ पत्रकार अशोक कुटे, विठ्ठल वडकूते, धाराजी भुसारे, कैलास चव्हाण,माणिक रासवे ,बालाजी देवके, मोहन धारासुरकर, शेख मुबारक, आबासाहेब कडपाटील, अनिल लांडगे, नामदेव सावळे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment