"जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यता दिवस व रक्षाबंधन उत्सव साजरे "
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये 15 आॅगस्ट रोजी शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक प्रा. डॉ. मुजांभाऊ धोंडगे, प्रमुख अतिथी म्हणून रामप्रसाद सारडा, राजकुमार अंबुरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्याताई धोंडगे, शाळेचे प्राचार्य.अजय सर, तसेच आदरणीय पालक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख अतिथी रामप्रसाद सारडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर शाळेतील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला, रामप्रसाद सारडा यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करूण गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले.अध्यक्ष समारोपा मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुजांभाऊ धोंडगे यांनी सोनपेठ परीसरातील दर्जेदार शैक्षणिक व्यवस्था पुरविण्यासाठी सदैव कटिबद्ध असण्याचे मत व्यक्त केले.त्यानंतर सोनपेठ शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले, रॅलीदरम्याण देशभक्तीचा आणि देश प्रेमाचा संदेश देणारी कलाकृती विद्यार्थ्यांनी सोनपेठ येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी सादर केला.यामधे भारतीय पायलट अभिनंदन ची सुखरुप देशवापसी, तसेच पुलमावा या ठिकाणी शहिद झालेल्या विरांना आदरांजली म्हणून तो प्रसंग सादर केला.शेवटी रक्षाबंधाचा उत्सव जवानांना राखी बांधून साजरा करण्यात आला. पुढील फेरी ढोलताशाच्या गजरात पार पाडली. विद्यार्थ्यांचा उत्साह आनंद वर्धक होता.यावेळी सर्व शिक्षक, शिक्षीका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी अथक परीश्रम घेतले.
No comments:
Post a Comment