Saturday, September 21, 2019

मानवी जीवनात परंपरेचे स्थान अत्यंत महत्वपूर्ण असते : डॉ. शिवलिंग शिवाचार्य

मानवी जीवनात परंपरेचे स्थान अत्यंत महत्वपूर्ण असते : डॉ. शिवलिंग शिवाचार्य

लातूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मानवी जीवनात परंपरेचे स्थान अत्यंत महत्वपूर्ण असते. या परंपरेच्या वारशावरच समाजाची वाटचाल यशस्वीरीत्या होत असते, असे प्रतिपादन शतायुषी राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज
यांनी केले. लातूर शहरातील आदर्श कॉलनी मधील  कम्युनिटी हॉल  सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ७६ व्या भव्य सत्संग सोहळ्यात डॉ. शिवलिंग शिवाचार्य बोलत होते. या सोहळ्याचे आयोजन डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळ,लातूरच्या संयोजक सौ.लताताई मुद्दे यांनी केले होते तर आयोजक सुधीर गुरुलिंगप्पा तोडकरी परिवार रेणापूरकर हे होते. यावेळी उपस्थित सदभक्तांना आशीर्वचन देताना डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती आपआपल्या कुटुंब परंपरेचे आचरण, पालन करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपले कुटुंब, परिवार संतांच्या सहवासात राहावा, असे अनेकांना वाटते. कारण संतांच्या संगतीने मानवी जीवनाचे निश्चितच कल्याण होते. व्यक्ती दैनंदिन जीवनातही परंपरेचे निष्ठेने पालन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आपणास पाहायला मिळते. ज्या कुळात अहिंसा, सत्याची कास धरली
जाते, ते कुळ  अत्यंत पवित्र असते. त्या कुळात जन्माला येणाऱ्यांच्या हातून सतत चांगले कार्य घडत असते. त्या कुळात कधीही कोणाचा व्देष , मत्सर
केला जात नाही. प्रत्येकाने आपले जीवन जगत  असतांना केवळ मनुष्यच नव्हे तर  प्रत्येक
प्राणीमात्राला सुखी करण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येक मनुष्य कर्म करीत असतो. कर्म करीत असताना ते चैतन्यमय असले पाहिजे. ज्यावेळी मनुष्याच्या अंतरात्म्यात चैतन्य निर्माण होते त्यावेळी व्यक्तीच्या मनात विचारांची निर्मिती होत असते. व्यक्ती ज्यावेळी आपल्या भावना व्यक्त करते,त्यास आपण बोलणे असे म्हणतो,  विचारांची अभिव्यक्ती म्हणजेच बोलणे,
भाष्य काराबने होय,असेही डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी सांगितले.आपण ज्या वास्तूत,घरात राहतो, त्या ठिकाणी ज्या प्रकारचे भाष्य होते त्यावरून त्या घरात चांगले - वाईट संस्कार घडतात. त्यासाठी प्रत्येकाने आपली वाणी, भाषा चांगली ठेवण्याचा प्रयत्न करावा,असेही डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर गुरुलिगअप्पा तोडकरी वरदाशंकर तोडकरी मधुकर तोडकरी प्रेमाकर तोडकरी; सौ.लताताई मुद्दे, शिवकांत स्वामी गुरुजी, बालाजी भिगोले यांसह समस्त तोडकरी  परिवारातील  सदस्यांनी परिश्रम घेतले.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment