देवडी गावच्या अंगणात गंगा आली...देशमुख कुटुंबियांच्या प्रयत्नातून ; सकाळ रिलीफ फंडाच्या सौजन्यानं नव्यानेच बांधलेला आड़ी बंधारा तुडुंब भरला
देवडी / बीड /परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
सकाळ रिलीफ फंडाच्या सौजन्यानं आणि एस.एम.देशमुख,दिलीप देशमुख यांच्या प्रयत्नातून साकारलेला देवडी येथील आड़ी बंधारा दोन दिवस देवडी परिसरात झालेल्या पावसाने तुडुंब भरला आहे.या बंधार्यामुळे गावची तहान तर भागणार आहेच त्याचबरोबर देवडी गावची दुष्काळाच्या दुष्टचक्रातून कायमची मुक्तता होणार आहे.बंधार्याच्या माध्यमातून देशमुख कुटुंबाने गावच्या सर्वांगिण विकासात जे योगदान दिले आहे त्याबद्दल गावकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वडवणी तालुक्यातील देवडी हे गाव गेली काही वर्षे दुष्काळाच्या फेर्यात अडकलेले आहे.दोन नद्याच्या काठावर असलेल्या या गावाला आता जवळपास बारमाही पाणी टंचाईच्या संकटाशी झुंजावे लागत आहे.पाणी नसल्याने शेतीही बिनभरवश्याची बनली आहे.अशा स्थितीत पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी अशी माजी सरपंच माणिकराव देशमुख यांची इच्छा होती, ग्रामस्थांची देखील तशी मागणी होती.माणिकराव देशमुख दोन वेळा गावचे सरपंच असताना त्यांनी त्यादृष्टीनं प्रयत्नही केले होते.त्यानंतर एस.एम.देशमुख यांनी हा बंधारा व्हावा यासाठी सरकार दरबारी देखील प्रयत्न केले होते.आता अखेर सकाळ रिलीफ फंड या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आणि देशमुख परिवाराच्या प्रयत्नातून देवडी गावात आडी येथे भव्य असा बंधारा उभारण्यात आला आहे.81 मिटर रूंद भित असलेला हा महाराष्ट्रातील हा एकमेव बंधारा असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.81 मिटर रूंद भिंत,800 मिटरची लांबी,जवळपास 8 कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेला हा बंधारा गावचा चेहरामोहरा बदलू शकेल असा विश्वास ग्रामस्थांना आहे. बंधार्यासाठी जवळपास 80 लाख रूपये खर्च कऱण्यात आले आहेत.
या बंधार्याचा लोकार्पण आणि जलपूजन सोहळा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती गावचे भूमिपुत्र अणि जेयष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी दिली.माध्यमांशी बोलताना एस.एम.देशमुख यांनी हा बंधारा आमच्या देशमुख कुटुंबियांचा ड्रीम प्रोजेक्ट होता,तो पूर्णत्वास जावा यासाठी आम्ही मागील दहा वर्षे सतत प्रयत्न करीत होतो त्याला आता यश आले ही आमच्यासाठी अत्यंत आनंंदाची आणि समाधानाची बाब असल्याचे मत व्यक्त केलं .हा बंधारा व्हावा अशी आमच्या वडिलांची इच्छा होती ती आम्हाला पूर्णत्वास नेता आली त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो.असे सांगून ते म्हणाले, बंधारयामुळं 'गंगा आली हो अंगणी' अशी आमची भावना असून या गंगेमुळे गावचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.देशमुख यांनी सकाळ रिलीफ फंडाला आणि या कामात ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले अशा व्यक्ती आणि संस्थांना धन्यवाद दिले आहेत.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment