राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा परभणी जिल्हा बंद ! बंद !! बंद !!!
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना दिनांक 25 सप्टेंबर 2019 बुधवार रोजी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारा मध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही सहभाग नसताना केवळ सदरील गैरव्यवहारात आरोप असलेल्या व्यक्ती या माननीय पवार साहेबांच्या विचाराच्या आहेत एवढ्या तुटपुंज्या कारणावरून व कोणतेही सबळ कारण, पुरावे नसताना माननीय पवार साहेबांन विरुद्ध खोटा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मागील पाच वर्षात कोणतीही कारवाई नकरता आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात सदरील खोटा गुन्हा नोंदवून माननीय पवार साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष केल्या जात आहे. त्यातूनच असे खोटे गुन्हे नोंदविण्यात येत आहेत याचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी परभणी तीव्र विरोध करत आहे. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विरुद्ध नोंदविण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ उद्या दिनांक 26 सप्टेंबर 2019 गुरुवार रोजी परभणी शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ बंद ठेवून जिल्हा बंद करण्यात येत असून उपरोक्त दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment