सोनपेठ तालुक्यात दोन तरुणांच्या आकस्मित मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील भोई समाजातील तरूण युवकांचे लुनावरून नाल्यात पडून मृत्यू झाला तर तालुक्यातील खपाट पिंप्री येेथिला तरूण शेतमजुराने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याच्या घटनेची सोनपेठ पोलिसात स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
सविस्तर वृत असे की सोनपेठ शहरातील सिरसाळा रोडच्या पांदन रस्त्यावर भोई समाजातील लक्ष्मण हरनाजी बावने वय १९ वर्ष या युवकांची दि.२४/९/२०१९ मंगळवार रोजी नगर पालिकेच्या खोल नाल्यात पडून आकस्मित मृत्यू झाल्याची घटनेचा माहिती मयतेच्या भावाने पोलिसात दिली. तर तालुक्यातील खपाट पिंप्री येथील एका शेतकऱ्यांच्या शेतावर शेतमजुर म्हणून कामावर असलेल्या राऊल मारोतराव सापनार वय ३५ वर्ष रा.धानोरा ता.सेनगांव यांनी दिंनाक २४/९/२०१९ च्या रोजी दारूच्या नशेत शेतमालकाच्या किरायाने रहात असलेल्या घरात विषारी औषधी पिवून आत्महत्या केल्याचे जबाब पोलिसात मयतेच्या पत्नीने दिल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही घटनाची आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली व पुढील कार्यवाही करता दोन्ही घटनेतील मयतेचे शवविच्छेदन सरकारी दवाखान्यात केले.या घटनेची पुढील कार्यवाही पो.नि.गजानन भातलंवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आडे, शिंदे आणि यादव हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment