Tuesday, September 3, 2019

शालेय विद्यार्थ्यांना महिला बचत गटाच्या मार्फत कापडी पिशव्यांचे मोफत वाटप

शालेय विद्यार्थ्यांना महिला बचत गटाच्या मार्फत कापडी पिशव्यांचे मोफत वाटप
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील केंद्रीय कन्या शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ व सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात महिला बचत गटाच्या मार्फत तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे शालेय विद्यार्थ्यांना वाटप कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक सोनमताई देशमुख (मुख्याधिकारी), प्रमुख पाहुणे पत्रकार गणेश पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी, नगरपरिषद कर्मचारी दिवाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रभारी मुख्याध्यापक रमेश राठोड, केंद्रीय कन्या शाळा मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, सर्व मान्यवरांचे स्वागत महिला बचत गटांच्या सदस्या  यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली यावेळी प्रास्ताविक सय्यद मॅडम मनोगत बारडताई, गणेश पाटील व राऊत सर यांनी केले मुख्य मार्गदर्शन सोनमताई देशमुख यांनी याआधी नगरपरिषदेने सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळा घंटागाडी मध्ये टाकण्यासाठी मुलांच्या मार्फत पालकांना आव्हान केले तसेच प्लास्टिक पिशवीचा वापर कमी करण्यासाठी या कापडी पिशव्यांचे वाटप विद्यार्थ्यांना यासाठी या विद्यार्थ्यांच्या हातून आपल्या पालकांना एक संदेश जावा जेनेकरून कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी नेहमी कापडी पिशवीचा वापर करण्यात यावा व प्रदूषण टाळावे प्रदूषणाचे दुष्परिणाम तसेच कंपोस्ट खताचे महत्व यावेळी सविस्तर त्यांनी पटवून दिले, डिघोळ येथिल न.प.कंपोस्ट खत प्रकल्प दाखवण्याचे आश्वासन सर्व विध्यार्थ्यांना यावेळी दिले.या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय कन्या शाळेच्या वतीने ही सोनमताई देशमुख यांचा व महिला बचत गटांच्या सदस्या आदिचे स्वागत करण्यात आले तसेच याप्रसंगी सोनमताई देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कारेक्रमाचे  सूत्रसंचालन पुकाणेताई तर आभार सय्यद मँडम यांनी मानले.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment