महाराष्ट्र शासना विरुद्ध महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पुकारून शेवटचा एल्गार
सोनपेठ (दर्शन) :- महाराष्ट्र शासनाच्या माननीय अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 4 सप्टेंबर 2019 बुधवार रोजी संपन्न झालेल्या बैठकीत महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सन्माननीय तोडगा ननिघाल्याने माननीय जिल्हा अध्यक्ष परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटना यांच्या सूचने वरून सोनपेठ तालुका महसूल कर्मचारी वर्गांनी दिनांक 5 सप्टेंबर 2019 गुरुवार पासून बेमुदत संप पुकारून शेवटचा एल्गार उभारलेला दिसतो.यामध्ये सोनपेठ तहसील कार्यालयाचे महसूल कर्मचारी नायब तहसीलदार साहेबराव घोडके, नायब तहसीलदार प्रशांत तेलंग, अव्वल कारकून तथा तालुका अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना सोनपेठ नारायण पिंपळे, अव्वल कारकून तथा सरचिटणीस गंगाधर विरमले, अव्वल कारकून ज्योती पगारे, लिपिक सागर गडप्पा, विश्वनाथ कनके, दिनकर सर्वदे, शिवाजी शिंदे, मदन चव्हाण, गोविंद राठोड, साहेबराव जाधव, शिपाई प्रवीण होनाळे, अशोक जामोद, इस्माईल शेख व रहीमभाई शेख आदींचा सहभाग असून सर्वसामान्य जनतेच्या अनेक कामाचा श्रीगणेशा होणार असे बोलल्या जात आहे तरी महाराष्ट्र शासन यावर लवकरात लवकर या महसुल कर्मचारी संघटनेच्या प्रलंबीत मागण्यावर सन्माननीय तोडगा काढेल अशी आशा जनतेतून व्यक्त होताना दिसत आहे.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment