कै.र.व.महाविद्यालय येथे शहिद भगतसिंह जयंती व खेळाडूंचा सत्कार संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने शहिद भगतसिंग जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाविद्यालयातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यामध्ये दिनांक २४ सप्टेंबर २०१९ ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे झालेल्या विद्यापीठ स्तरीय मैदानी स्पधैत महाविद्यालयाच्या सय्यद शहबाज सय्यद अझम या खेळाडूंने उंच उडी क्रिडा स्पधेत विद्यापीठातून सर्व प्रथम क्रमांक पटकावला व गोल्डमेडल मिळवले तर खो खो क्रिडा प्रकारामध्ये महाविद्यालयाचा खेळाडू केतन चौधरी हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत ड झोन महाविद्यालयच्या मुलांच्या विद्यापीठस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही स्पर्धा स्वा रा ती म विद्यापीठाच्या सब सेंटर लातूर दिनांक ०६ व ७ आक्टोबर २०१९ रोजी होणार आहे यासाठी सराव शिबीर दि २९/०९/२०१९ पासून के के एम महाविद्यालय मानवत येथे आयोजित केले आहे त्याचप्रमाणे तालुका स्तरावरील मैदानी स्पधैत १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलीच्यां संघाने सहभाग नोंदवला तालुका स्तरीय स्पर्धा माधव आश्रम विध्यालय खडका येथे दिनांक २७/०९/२०१९ रोजी पार पडल्या यामध्ये वेगवेगळ्या क्रिडा प्रकारात महाविद्यालयाच्या खेळाडूंने कामगिरी बजावली यात अशोक जाधव खेळाडूंने ५,००० मीटर धावने प्रथम,१०,००० मीटर धावने प्रथम, ६,००० मीटर क्रॉसकंट्री प्रथम विशाल कसबे खेळाडू उंच उडी प्रथम लांब उडी प्रथम वैजेनाथ पवार खेळाडू १०० मीटर धावने प्रथम २०० मीटर धावने प्रथम लांब उडी द्वितीय सौरभ बोकरे खेळाडू तिहेरी उडी प्रथम मुलींच्या गटात खेळाडू मध्ये सिमा पवार खेळाडूने लांब उडी प्रथम,उंच उडी प्रथम,तिहेरी उडी प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हा स्तरीय स्पर्धासाठी निवड झाली या यशाबद्दल ह शि प्र मंडळाचे अध्यक्ष मा परमेश्वर कदम,प्राचार्य डॉ वंसत सातपुते, प्राचार्या शेख शकिला,क्रिडा संचालक प्रा वाकणकर जी बी,डॉ मुकुंदराज पाटील, डॉ अशोक जाधव,डॉ संतोष रणखांब,प्रा सखाराम कदम,डॉ सुनिता टेंगसे,प्रा आरती बोबडे, प्रा सुरेश मोरे, प्रा गव्हाने शशिकांत,प्रा कैलास आरबाड ,प्रा जाधव भैय्यासाहेब,प्रा फले पांडुरंग,प्रा जगदीश भोसले खेळाडूचे पालक सय्यद अझम, प्रा जीवन भोसले, श्री परळकर संतुक, श्री सोनटक्के दत्ता,श्री कुलकर्णी संतुक, श्री हाके भागवत,श्री फड बाबुराव, क्रिडा समिती सदस्य,सर्व प्राध्यापकानी विजेता खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
Saturday, September 28, 2019
कै.र.व.महाविद्यालय येथे शहिद भगतसिंह जयंती व खेळाडूंचा सत्कार संपन्न
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment