Friday, September 20, 2019

सोनपेठ शहरात पुन्हा भुरट्या चोरांचा सुळसुळाट

सोनपेठ शहरात पुन्हा भुरट्या चोरांचा सुळसुळाट
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मुख्य रस्त्यावरील दोन दुकाने फोडून दुकानातील बावन हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल दुकानाचे शटर वाकवून लंपास करण्यात आला, त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातीलस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात रोडवरील पवन किराणा दुकान व सरदार बिअर शॉपी चे शटर तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केल्या मुळे या आदी अशा चोरीच्या घटना घडूनही पोलिस प्रशासनाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.दर सोमवारी आठवडी बाजार असताना भर बाजारातून अनेक मोबाईल चोरी होत असतात या मोबाईलचा पोलीस स्टेशन येथे कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंद होत नसल्यामुळे या मोबाईल चौरांचे फावलेले दिसून येत आहे तसेच काहि दिवसा पुर्वी आठवडी बाजारातुन मोटार सायकल चोरी झाली तीची हि फिर्याद सोनपेठ पोलीस स्टेशनला घेतली नसल्याची माहीती आहे अशा घटनांची फिर्याद घेत नसतील तर कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक मा.कृष्णकांत उपाध्याय यांच्या मो.7720008688 या क्रमांकावर संपर्क साधुन कैफियत मांडावी,
याआधीही अनेक कृषी केंद्र, अनेक पानटपरी, अनेक किराना दुकान येथे चोरांनी असाच लाखो रुपयाचा डल्ला मारलेला असूनही या चोरीतील आरोपी आजतागायत सोनपेठ पोलीस प्रशासनाला मिळून आलेले नाहीत, आजही केवळ दोन नंबरचे अवैध्य धंदे खुलेआमपणे कुणाच्या आशिर्वादाने चालु आहेत असा सवालही जनतेतुन विचारला जात आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण असून लहान मोठे व्यापारी आपल्या दुकानांमध्ये वाचमन अथवा स्वतः सुरक्षा करताना दिसून येत आहेत तरीही पोलीस प्रशासनाची पेट्रोलिंग गाडी कशी आणि कधी आणि केव्हा पेट्रोलिंग करते हा चर्चेचा विषय झाला आहे. या बाबीकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहून तात्काळ या चोरांचा बंदोबस्त करतील का असा सवाल या सर्व लहान मोठ्या व्यापारी वर्गातून विचारला जात आहे.

No comments:

Post a Comment