जि.प.प्रा.लोकरवाडी शाळेचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश ; प्रतीक गुट्टे व शशिकांत दुधानेचे सर्वस्तरातुन अभिनंदन
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ शहरातील परमेश्वर भैया मित्र मंडळ व एल.आर.के.इंग्लिश स्कुल संयुक्त विद्यमाने हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसा निमित्त कै.र.व.महाविद्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जि.प.प्रा.लोकरवाडी शाळेचा विद्यार्थी चि.प्रतीक वाल्मिक गुट्टे हा मोठ्या गटातून द्वितीय क्रमांक मिळवला आणि स्मृतीचिन्ह व रोख 1501/ - रु पारितोषिक पटकावले.या विद्यार्थ्यांने "370 कलमाचे महत्व भारत व काश्मीरसाठी" या विषयावर विचार मांडले.तसेच लहान गटातून चि.शशिकांत दुधाने या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ पारितोषिक व स्मृतीचिन्ह मिळवले या विद्यार्थ्याने "शेतकरी व गरिबी हा भारतीय राजकारणातील फक्त बोलण्याचा विषय" या विषयावर मनोगत व्यक्त केले.ग्रामीण भागातील या दोन्ही बहाद्दूर विद्यार्थ्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.लोकरवाडी शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन ! या यशस्वी विद्यार्थी यांचे गट शिक्षणाधिकारी शौकत साहेब, उखळी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरनर, केंद्रीय मुख्याध्यापक शिंगाडे, मुख्याध्यापक शहानिक गित्ते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षणतज्ञ,ह.शि.प्र.म.अध्यक्ष परमेश्वर कदम, ग्रंथवाचन चळवळीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर खेडकर, संपादक किरण स्वामी, कै.राजाभाऊ कदम विद्यालयाचे प्राचार्य दत्ता नरहरे, मार्गदर्शक शिक्षक बळीराम नाईक, सनीदेवल जाधव, रहीम शेख, विठ्ठल गुट्टे व तसेच शालेय समिती सदस्य व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.
सोनपेठ परीसरातील बातम्या व दिपावली 2019 कविता, विशेष लेख आणि आपल्या छोटयाशा जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment