Friday, September 20, 2019

सावधान राहा...! विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आजच!

सावधान राहा...! विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आजच!

पुणे / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

महाराष्ट्रासह हरयाना आणि झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभांचे बिगुल आज वाजण्याची शक्यता असून निवडणूक आयोगाने दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचे मतदान दिवाळीआधी होणार की नंतर, याची उत्सुकता असणार आहे. निवडणुकीचे खरे वातावरण आजपासून सुरू होईल.
पुणे : महाराष्ट्रासह हरयाना आणि झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभांचे बिगुल आज वाजण्याची शक्यता असून निवडणूक आयोगाने दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचे मतदान दिवाळीआधी होणार की नंतर, याची उत्सुकता असणार आहे. निवडणुकीचे खरे वातावरण आजपासून सुरू होईल.
राज्यातील सत्ताधारी भाजपची महाजनादेश यात्रा काल संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तिचा समारोप झाला. त्यानंतर निवडणुकीची घोषणा होईल, असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत होता. त्यानुसार त्याच्या दुसऱ्या दिवशीच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभेचे मतदान चार टप्प्यांत घेण्यात आले होते. विधानसभेसाठी मतदान आय़ोग किती टप्प्यांत घेणार, याकडे लक्ष राहील.  
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसह सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होण्याची प्रबळ शक्यता आहे. उदनयराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथील जागा रिक्त आहे. निवडणूक आचारसंहिता निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तात्काळ अमलात येणार आहे.
राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही, याची सर्वाधिक उत्सुकता आहे. त्यावर राज्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाली असून तिची औपचारीक घोषणाही झाली आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवारही निश्चित करण्यास सुरवात केली आहे. 

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment