Thursday, September 5, 2019

शिक्षकाने समाजासाठी दीपस्तंभ म्हणून काम करावे  - मुख्याध्यापक सोनकांबळे ; कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत शिक्षक दिन उत्साहात

शिक्षकाने समाजासाठी दीपस्तंभ म्हणून काम करावे  - मुख्याध्यापक सोनकांबळे ; कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत शिक्षक दिन उत्साहात

सोनपेठ  (दर्शन) :-

शालेय विद्यार्थीच देशाच्या जडण घडणीचा पाया असतात. त्यामुळे शिक्षकांवर मोठी जबाबदारी आहे.शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या ज्ञानदानाच्या कर्तव्यात दक्ष राहणे गरजेचे असते. त्यामुळे  शिक्षकाने समाजासाठी दीपस्तंभ म्हणून काम करावे लागेल असे प्रतिपादन मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे यांनी केले. खडका येथील कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
       खडका येथील कै. राजीवगांधी अनु. जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे हे होते. याप्रसंगी  वस्तीगृह अधिक्षक डी. एम. माने, जेष्ठ शिक्षक यु.डी. राठोड, एस.डी. जालमिले, एच. के. भालेरावआदी उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक  एस.डी. जालमिले यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक एस. एम. राठोड यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते .

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment