परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभेत आघाडीच्या उमेदवाराला साथ द्या -मो.गौस कुरेशी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्हा भारतीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मोहम्मद गौस कुरेशी यांचा परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा परभणी, पाथरी, जिंतूर व गंगाखेड दौरा एक फेरी पूर्ण झाली असून मतदार राजा हा जागृत झालेला दिसून येत आहे.जेथे भेट देइल तेथे काँग्रेस, राष्ट्रवादि काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड अशी जनतेची सुप्त लाट निर्माण झालेली दिसून येत आहे. जिंतूर व गंगाखेड विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा निवडून येतील तर परभणी व पाथरी विधानसभेसाठी मतदारांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला साथ द्यावी असे आवाहन करत परभणी जिल्हा भारतीय काँग्रेस प्रवक्ते मो.गौस कुरेशी यांनी एक फेरी पूर्ण केली असून या विद्यमान शासनाने आश्वासनाच्या पुढे परभणी जिल्ह्यात केवळ कागदो पत्री मोठमोठा निधी दिल्याचे सतत सांगत आहेत पण प्रत्यक्षात निधी गेला कुठे ? असा प्रश्न जनतेला पडलेला दिसून येत आहे आता यांना धडा शिकवण्याची जनता जनार्दन ठराव करणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीलाच पुन्हा संधी देण्याच्या मानसिकतेत जनता आज दिसत आहे परभणी जिल्ह्यातील परभणी व पाथरी विधानसभा मतदारसंघाचा अति महत्वाचा प्रश्न रस्ते असून रस्ते विकासावर निधी कागदो पत्रीच दिसून येत आहे ग्रामीण भागात गोदाकाठची जनता कसे जीवन जगत आहे? हे तर विद्यमान आमदार यांचा संशोधनाचा विषय ठरेल या प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार तमाम जनतेला न्याय मिळवून देतील व अती महत्त्वाचे रस्त्याचे खरे प्रत्यक्षात जाळे निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील असेही आश्वासीत करताना दिसत आहेत.
No comments:
Post a Comment