सोनपेठ नगर परिषद विविध विकास कामाच्या भूमि पूजनाचा भाजपाच्या वतीने जाहीर निषेध
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोनपेठ नगर परिषदेचा विविध विकास कामांच्या भूमिपूजन कारेक्रमाचा भाजपाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
एका प्रसिद्धी पत्रकात सोनपेठ नगर परिषदेस माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन) यांनी पाथरी विधानसभेच्या भाजपा सहयोगी सदस्य आमदार मोहन फड यांच्या माध्यमातून शहर विकास कामासाठी अंदाजे वीस कोटी रुपयांचा निधी संकलित करून दिला असल्यामुळे या निधीतून दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेत माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोटो अथवा भाजपच्या कमळ या निशाणीला तसेच भाजपा नावाचा कोठेही जाणीव पूर्वक उल्लेख केला नसल्यामुळे तसेच भाजप चा विसर पडलेला दिसत आहे या कारणामुळे सोनपेठ तालुका भाजपाच्या वतीने या भूमिपूजन कार्यक्रमाचा या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून या प्रसिद्धी पत्रकावर भारतीय जनता पार्टी जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व शहर पदाधिकारी आदींच्या स्वाक्षरी आहेत.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment