Monday, September 16, 2019

काँग्रेस - राष्ट्रवादि प्रत्येकी १२५-१२५ जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी ३८ जागा

काँग्रेस - राष्ट्रवादि प्रत्येकी १२५-१२५ जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी ३८ जागा

नाशिक / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
नाशिक येथे पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा ५०-५० असा फॉर्म्युला ठरला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रातील २८८ जागांपैकी प्रत्येकी १२५-१२५ जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी ३८ जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागावाटपाचं सूत्र ठरलेलं असलं, तरी कोणती जागा कोण लढवणार, कोणते उमेदवार मैदानात उतरणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप आणि डावे पक्ष या मित्रपक्षांपैकी कोणाला किती जागा मिळणार याचा निर्णय लवकरच होईल. 

या आठवड्यात कदाचित निवडणुका जाहीर होतील. प्रत्यक्ष मतदानाला २५-३० दिवस राहिले आहेत. काही जागांवर अदलाबदल शक्य आहे. नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर संयुक्त सभांचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे.

ज्या पक्षात आमचे लोक जातात त्या पक्षाच्या नेत्यांना त्यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे. आमच्यातले अनेकजण पक्ष सोडून जात आहेत. राज्यात त्यांची सत्ता येईल अस काहींना वाटतंय.

२७ वर्ष मी विरोधी बाकावर होतो. मला विरोधी पक्षात जास्त समाधान मिळालं. कारण विरोधक म्हणून थेट लोकांपर्यंत पोहचता येतं. 

१९५७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला त्यानंतर पुन्हा काँग्रेस सत्तेत आली. आमच्या पक्षातील काही जणांच्या संस्थेची चौकशी सुरु झाली आहे, असं गेलेले अनेक जण सांगतात. सरकारी यंत्रणांचा आयुध म्हणून वापर केला जात आहे. लोक शहाणे आहेत, तेच या मेगाभरतीचा निकाल लावतील.

No comments:

Post a Comment