छेपरभणी वासियांचा पुणे येथे डॉ.जगदीश शिंदे आयोजित स्नेहमेळावा-गेट टुगेदर सहभाग नौंदवा
भोसरी / परभणी / पाथरी / सोनपेठ (दर्शन) :-
पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील नोकरी निमित्ताने आलेल्या परभणी, पाथरी येथील भूमिपुत्रांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे. दि. २२ सप्टेंबर १९ रोजी स. ११ वाजता आळंदी येथील सुयश मंगल कार्यालयात होणार आहे.भविष्यात आपल्याच परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि पुढील पिढयांना बेरोजगारी मुळे स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये याकरिता एकत्र येऊ अशा निर्धाराने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त मूळचे परभणी, पाथरी,मानवत, सोनपेठ,सेलू, जिंतूर,गंगाखेड, पूर्णा व पालम येथील विध्यार्थी,महिला, पुरुष तथा जेष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमास हजर रहावे असे आवाहन आयोजक डॉ जगदीश शिंदे यांनी केले आहे. डॉ. जगदीश शिंदे भोसरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. डॉ. शिंदे पेशाने डॉक्टर असून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. ओंकार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून निशुल्क वृद्धश्रम,सामूहिक विवाह सोहळे,रोजगार मेळावे,मोफत शस्त्रक्रिया, विध्यार्थ्यांसाठी करियर माग्दार्शनाचे कार्यक्रम,आरोग्य तपासणी, शालेय साहित्य वाटप तसेच 200 हुन अधिक आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांना पेरणी साठी बियाण्याचे वाटप असे अनेक समजयोगी कामे त्यांनी केली असून आता परभणीपासून विस्थापित झालेल्या नागरिकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment