शिवसेनेला 144 जागा न मिळाल्यास युती तुटण्याची शक्यता : - दिवाकर रावते
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य करुन दिवाकर रावतेंनी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते आज एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी युतीबद्दलच्या शक्यता वर्तवल्या.
लोकसभा निवडणुकीआधी युती करताना भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचं, तसेच विधानसभेला शिवसेनेला 144 म्हणजेच निम्म्या (288) पैकी (144) जागा देण्याचं आश्वासन भाजपने दिलं होतं. त्यामुळे जर शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं रावतेंनी म्हटलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये भरमसाठ इनकमिंग झालं आहे. त्यामुळे भाजपला अधिक जागा हव्या आहेत. तसेच केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजप मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे युतीचं काय होणार? हा प्रश्न कळीचा झाला आहे.
No comments:
Post a Comment