कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ येथे राष्ट्रीय चर्चासत्रांचे कुलगुरू मा.डॉ.उद्धव भोसले उदघाटक
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.रमेश वरपुकर महाविद्यालयात राष्ट्रीय समाजिकशास्त्रे संशोधन संस्था प्रायोजित सोशल मिडीयाचा समाजावरील परिणाम व भारतीय समाज आणि विकलांग विमर्ष या दोन विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दि. 5 ऑक्टोबर 2019 शनिवार या दिवशी करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते व माजी आमदार मा.व्यंकटराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या प्रसंगी संस्था अध्यक्ष मा.परमेश्वर कदम, प्र-कुलगुरु मा.डॉ. जोगेंद्रसिह बिसेन, मा.आसाराम लोमटे, मा.डाॅ. महेंद्रकुमार ठाकुरदास, मा.डाॅ.सतिष आरबाड, प्राचार्य मा.डॉ.वसंत सातपुते आदी उपस्थीत राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी राष्ट्रीय स्तरावरून जवळपास 180 शोधनिबंध आले असल्याची माहीती कार्यशाळेचे समन्वयक डाॅ.मारोती कच्छवे व डॉ. शिवाजी वडचकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment