Sunday, September 29, 2019

सोनपेठ तालुक्यात नवरात्र महोत्सव तालुक्यात डिघोळची रेणुका तर शहरात विविध देवींची स्थापना

सोनपेठ तालुक्यात नवरात्र महोत्सव तालुक्यात डिघोळची रेणुका तर शहरात विविध देवींची स्थापना

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यात सुप्रसिद्ध अशी मौजे डिघोळ देवीची माता रेणुका अंबाबाई च्या दर्शनाला सबंध महाराष्ट्रातून भाविक भक्ताची रीघ लागते या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ आराधी गोंधळ आणि आरती तसेच महाप्रसाद नित्य नियमाचा असतो,शहरात महाजन गल्ली येथे एकता मित्र मंडळ दुर्गा माता, गणेशनगर मित्र मंडळ दुर्गा माता, संभाजीनगर विरशैव समाज मन्मथ स्वामी मंदिर दुर्गा माता व सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज सास्क्रतिक सभाग्रह दुर्गा माता आदी ठिकाणी घटस्थापना तसेच आकर्षक मूर्तींची स्थापना झालेली असून शहरातील महिला व पुरुष सर्व वयोगटातील तसेच मुल,मुली आदींची रीघ दर्शनाला लागलेली दिसत आहे,तसेच श्री माहेश्वरी माता नवरात्र महोत्सव निमित्य श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे दुर्गा
मातेची मूर्ती स्थापना झालेली असून श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ आयोजित गरबा व दांडिया आदी स्पर्धांचे आयोजन केलेले असून,महिलांनी संपर्क
साधून स्पर्धेत सहभाग घ्यावा तसेच कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री नंदिकेश्वर विचार मंच सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच
गावाची देवी मंदिर श्री जगदंब माता येथे हि घटस्थापना तसेच विविध कार्यक्रमाची रेलचेल असून या ठिकाणी महाप्रसाद दररोज वाटप होतो त्याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन येथील ब्राम्हण समाज बांधवानी केले आहे.तालुक्यातील डिघोळ श्री रेणुका माता नवरात्र महोत्सव दि.29 सप्टेंबर घट स्थापना दैनंदिन कार्यक्रम दररोज दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद सांगता दि.8 आक्टोंबर  विजयादशमी श्री ची पालखी मिरवणूक सायंकाळी 5 ते रात्री 10 नऊ दिवसाचे नऊ अन्नदाते तसेच नऊ दिवसाचे फराळाचे दाते अनेक मान्यवरांनी श्री रेणुका माता सेवा ग्रहण केलेली आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

सोनपेठ परीसरातील बातम्या व दिपावली 2019 कविता, विशेष लेख आणि आपल्या छोटयाशा जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

Saturday, September 28, 2019

कै.र.व.महाविद्यालय येथे शहिद भगतसिंह जयंती व खेळाडूंचा सत्कार संपन्न

कै.र.व.महाविद्यालय येथे शहिद भगतसिंह जयंती व खेळाडूंचा सत्कार संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने शहिद भगतसिंग जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाविद्यालयातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यामध्ये दिनांक २४ सप्टेंबर २०१९ ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे झालेल्या विद्यापीठ स्तरीय मैदानी स्पधैत महाविद्यालयाच्या सय्यद शहबाज सय्यद अझम या खेळाडूंने उंच उडी क्रिडा स्पधेत विद्यापीठातून सर्व प्रथम क्रमांक पटकावला व गोल्डमेडल मिळवले तर खो खो क्रिडा प्रकारामध्ये महाविद्यालयाचा खेळाडू केतन चौधरी हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत ड झोन महाविद्यालयच्या मुलांच्या  विद्यापीठस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही स्पर्धा स्वा रा ती म विद्यापीठाच्या सब सेंटर लातूर दिनांक ०६ व ७ आक्टोबर २०१९ रोजी होणार आहे यासाठी सराव शिबीर दि २९/०९/२०१९ पासून के के एम महाविद्यालय मानवत येथे आयोजित केले आहे त्याचप्रमाणे तालुका स्तरावरील मैदानी स्पधैत १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलीच्यां संघाने सहभाग नोंदवला तालुका स्तरीय स्पर्धा माधव आश्रम विध्यालय खडका येथे दिनांक २७/०९/२०१९ रोजी पार पडल्या यामध्ये वेगवेगळ्या क्रिडा प्रकारात महाविद्यालयाच्या खेळाडूंने कामगिरी बजावली यात अशोक जाधव खेळाडूंने ५,००० मीटर धावने प्रथम,१०,००० मीटर धावने प्रथम, ६,००० मीटर क्रॉसकंट्री प्रथम विशाल कसबे खेळाडू उंच उडी प्रथम लांब उडी प्रथम वैजेनाथ पवार खेळाडू १०० मीटर धावने प्रथम २०० मीटर धावने प्रथम लांब उडी द्वितीय सौरभ बोकरे खेळाडू तिहेरी उडी प्रथम मुलींच्या गटात खेळाडू मध्ये सिमा पवार खेळाडूने लांब उडी प्रथम,उंच उडी प्रथम,तिहेरी उडी प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हा स्तरीय स्पर्धासाठी निवड झाली  या यशाबद्दल ह शि प्र मंडळाचे अध्यक्ष मा परमेश्वर कदम,प्राचार्य डॉ वंसत सातपुते, प्राचार्या शेख शकिला,क्रिडा संचालक प्रा वाकणकर जी बी,डॉ मुकुंदराज पाटील, डॉ अशोक जाधव,डॉ संतोष रणखांब,प्रा सखाराम कदम,डॉ सुनिता टेंगसे,प्रा आरती बोबडे, प्रा सुरेश मोरे, प्रा गव्हाने शशिकांत,प्रा कैलास आरबाड ,प्रा जाधव भैय्यासाहेब,प्रा फले पांडुरंग,प्रा जगदीश भोसले खेळाडूचे पालक सय्यद अझम, प्रा जीवन भोसले, श्री परळकर संतुक, श्री सोनटक्के दत्ता,श्री कुलकर्णी संतुक, श्री हाके भागवत,श्री फड बाबुराव, क्रिडा समिती सदस्य,सर्व   प्राध्यापकानी विजेता खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

Friday, September 27, 2019

कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ येथे राष्ट्रीय चर्चासत्रांचे कुलगुरू मा.डॉ.उद्धव भोसले उदघाटक

कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ येथे राष्ट्रीय चर्चासत्रांचे कुलगुरू मा.डॉ.उद्धव भोसले उदघाटक

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील कै.रमेश वरपुकर महाविद्यालयात राष्ट्रीय समाजिकशास्त्रे संशोधन संस्था प्रायोजित सोशल मिडीयाचा समाजावरील परिणाम व भारतीय समाज आणि विकलांग विमर्ष या दोन विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दि. 5 ऑक्टोबर 2019 शनिवार या दिवशी करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते व माजी आमदार मा.व्यंकटराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या प्रसंगी संस्था अध्यक्ष मा.परमेश्वर कदम, प्र-कुलगुरु मा.डॉ. जोगेंद्रसिह बिसेन, मा.आसाराम लोमटे, मा.डाॅ. महेंद्रकुमार ठाकुरदास, मा.डाॅ.सतिष आरबाड,  प्राचार्य मा.डॉ.वसंत सातपुते आदी उपस्थीत राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी राष्ट्रीय स्तरावरून जवळपास 180 शोधनिबंध आले असल्याची माहीती कार्यशाळेचे समन्वयक डाॅ.मारोती कच्छवे व डॉ. शिवाजी वडचकर यांनी केले आहे.

Wednesday, September 25, 2019

औसा (लातूर), वडाळा (मुंबई), ऐरोली (ठाणे), बेलापूर (ठाणे), उल्हासनगर (ठाणे) 'या' पाच जागांवरून युतीचे घोडे अडले

औसा (लातूर), वडाळा (मुंबई), ऐरोली (ठाणे), बेलापूर (ठाणे), उल्हासनगर (ठाणे) 'या' पाच जागांवरून युतीचे घोडे अडले

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असूनही शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. सुरुवातीला निम्म्या जागांसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेने भाजपच्या ठाम पवित्र्यानंतर नमती भूमिका घेतली होती. मात्र, तरीही दोन्ही पक्षांमध्ये आणखी पाच जागांवरून चढाओढ सुरु आहे. कोणताही पक्ष या जागा सोडायला तयार नाही. 
सूत्रांच्या माहितीनुसार, युतीमधील ११ पैकी सहा जागांचा प्रश्न नुकताच सुटला. मात्र, अद्यापही पाच जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झालेले नाही. त्यामुळे आता या जागांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर बसून चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. 
या पाच जागांमध्ये औसा (लातूर), वडाळा (मुंबई), ऐरोली (ठाणे), बेलापूर (ठाणे), उल्हासनगर (ठाणे) या मतदारसंघाचा समावेश आहे. 
युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. घटस्थापनेपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ असेच सुरु राहील. नवरात्रीचे घट बसेपर्यंत युतीचे घट काही बसणार नाहीत. कारण युती जाहीर करण्यात पितृपक्षाचा अडसर आहे. आता युतीची चर्चा ही फक्त मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातच सुरू आहे. त्यामुळे २९ तारखेपर्यंत कुठलीही अधिकृत घोषणा होणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले. 
जागावाटपात भाजपने सुरुवातीपासूनच सेनेला अधिक जागा सोडायला नकार दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच तयार करतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. यानंतर भाजप शिवसेनेसाठी केवळ ११० ते ११६ जागा सोडायलाच तयार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे आता जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय असणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा परभणी जिल्हा बंद ! बंद !! बंद !!!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा परभणी जिल्हा बंद ! बंद !! बंद !!!

परभणी / सोनपेठ (दर्शन) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना दिनांक 25 सप्टेंबर 2019 बुधवार रोजी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारा मध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही सहभाग नसताना केवळ सदरील गैरव्यवहारात आरोप असलेल्या व्यक्ती या माननीय पवार साहेबांच्या विचाराच्या आहेत एवढ्या तुटपुंज्या कारणावरून व कोणतेही सबळ कारण, पुरावे नसताना माननीय पवार साहेबांन विरुद्ध खोटा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मागील पाच वर्षात कोणतीही कारवाई नकरता आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात सदरील खोटा गुन्हा नोंदवून माननीय पवार साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष केल्या जात आहे. त्यातूनच असे खोटे गुन्हे नोंदविण्यात येत आहेत याचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी परभणी तीव्र विरोध करत आहे. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विरुद्ध नोंदविण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ उद्या दिनांक 26 सप्टेंबर 2019 गुरुवार रोजी परभणी शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ बंद ठेवून जिल्हा बंद करण्यात येत असून उपरोक्त दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

Tuesday, September 24, 2019

सोनपेठ तालुक्यात दोन तरुणांच्या आकस्मित मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली

सोनपेठ तालुक्यात दोन तरुणांच्या आकस्मित मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील भोई समाजातील तरूण युवकांचे लुनावरून नाल्यात पडून मृत्यू झाला तर तालुक्यातील खपाट पिंप्री येेथिला तरूण शेतमजुराने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याच्या घटनेची सोनपेठ पोलिसात स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
सविस्तर वृत असे की सोनपेठ शहरातील सिरसाळा रोडच्या पांदन रस्त्यावर भोई समाजातील लक्ष्मण हरनाजी बावने वय १९ वर्ष या युवकांची दि.२४/९/२०१९ मंगळवार रोजी नगर पालिकेच्या खोल नाल्यात पडून आकस्मित मृत्यू झाल्याची घटनेचा माहिती मयतेच्या भावाने पोलिसात दिली. तर तालुक्यातील खपाट पिंप्री येथील एका शेतकऱ्यांच्या शेतावर  शेतमजुर म्हणून कामावर असलेल्या राऊल मारोतराव सापनार वय ३५ वर्ष रा.धानोरा ता.सेनगांव यांनी दिंनाक २४/९/२०१९ च्या रोजी दारूच्या नशेत शेतमालकाच्या किरायाने रहात असलेल्या घरात विषारी औषधी पिवून आत्महत्या केल्याचे जबाब पोलिसात मयतेच्या पत्नीने दिल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही घटनाची आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली व पुढील कार्यवाही करता दोन्ही घटनेतील मयतेचे शवविच्छेदन सरकारी दवाखान्यात केले.या घटनेची पुढील कार्यवाही पो.नि.गजानन भातलंवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आडे, शिंदे आणि यादव हे करीत आहेत.

जि.प.प्रा.लोकरवाडी शाळेचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश ; प्रतीक गुट्टे व शशिकांत दुधानेचे सर्वस्तरातुन अभिनंदन

जि.प.प्रा.लोकरवाडी शाळेचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश ; प्रतीक गुट्टे व शशिकांत दुधानेचे सर्वस्तरातुन अभिनंदन

सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ शहरातील परमेश्वर भैया मित्र मंडळ व एल.आर.के.इंग्लिश स्कुल संयुक्त विद्यमाने हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसा निमित्त कै.र.व.महाविद्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जि.प.प्रा.लोकरवाडी शाळेचा विद्यार्थी चि.प्रतीक वाल्मिक गुट्टे हा मोठ्या गटातून द्वितीय क्रमांक मिळवला आणि स्मृतीचिन्ह व रोख 1501/ - रु पारितोषिक पटकावले.या विद्यार्थ्यांने "370 कलमाचे महत्व भारत व काश्मीरसाठी" या विषयावर विचार मांडले.तसेच  लहान गटातून चि.शशिकांत दुधाने या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ पारितोषिक व स्मृतीचिन्ह मिळवले या विद्यार्थ्याने "शेतकरी व गरिबी हा भारतीय राजकारणातील फक्त बोलण्याचा विषय" या  विषयावर मनोगत व्यक्त केले.ग्रामीण भागातील या दोन्ही बहाद्दूर विद्यार्थ्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.लोकरवाडी शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन ! या यशस्वी विद्यार्थी यांचे गट शिक्षणाधिकारी शौकत साहेब, उखळी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरनर, केंद्रीय मुख्याध्यापक शिंगाडे, मुख्याध्यापक शहानिक गित्ते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षणतज्ञ,ह.शि.प्र.म.अध्यक्ष परमेश्वर कदम, ग्रंथवाचन चळवळीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर खेडकर, संपादक किरण स्वामी, कै.राजाभाऊ कदम विद्यालयाचे प्राचार्य दत्ता नरहरे, मार्गदर्शक शिक्षक बळीराम नाईक, सनीदेवल जाधव, रहीम शेख, विठ्ठल गुट्टे व तसेच शालेय समिती सदस्य व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.
सोनपेठ परीसरातील बातम्या व दिपावली 2019 कविता, विशेष लेख आणि आपल्या छोटयाशा जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

Saturday, September 21, 2019

मानवी जीवनात परंपरेचे स्थान अत्यंत महत्वपूर्ण असते : डॉ. शिवलिंग शिवाचार्य

मानवी जीवनात परंपरेचे स्थान अत्यंत महत्वपूर्ण असते : डॉ. शिवलिंग शिवाचार्य

लातूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मानवी जीवनात परंपरेचे स्थान अत्यंत महत्वपूर्ण असते. या परंपरेच्या वारशावरच समाजाची वाटचाल यशस्वीरीत्या होत असते, असे प्रतिपादन शतायुषी राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज
यांनी केले. लातूर शहरातील आदर्श कॉलनी मधील  कम्युनिटी हॉल  सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ७६ व्या भव्य सत्संग सोहळ्यात डॉ. शिवलिंग शिवाचार्य बोलत होते. या सोहळ्याचे आयोजन डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळ,लातूरच्या संयोजक सौ.लताताई मुद्दे यांनी केले होते तर आयोजक सुधीर गुरुलिंगप्पा तोडकरी परिवार रेणापूरकर हे होते. यावेळी उपस्थित सदभक्तांना आशीर्वचन देताना डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती आपआपल्या कुटुंब परंपरेचे आचरण, पालन करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपले कुटुंब, परिवार संतांच्या सहवासात राहावा, असे अनेकांना वाटते. कारण संतांच्या संगतीने मानवी जीवनाचे निश्चितच कल्याण होते. व्यक्ती दैनंदिन जीवनातही परंपरेचे निष्ठेने पालन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आपणास पाहायला मिळते. ज्या कुळात अहिंसा, सत्याची कास धरली
जाते, ते कुळ  अत्यंत पवित्र असते. त्या कुळात जन्माला येणाऱ्यांच्या हातून सतत चांगले कार्य घडत असते. त्या कुळात कधीही कोणाचा व्देष , मत्सर
केला जात नाही. प्रत्येकाने आपले जीवन जगत  असतांना केवळ मनुष्यच नव्हे तर  प्रत्येक
प्राणीमात्राला सुखी करण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येक मनुष्य कर्म करीत असतो. कर्म करीत असताना ते चैतन्यमय असले पाहिजे. ज्यावेळी मनुष्याच्या अंतरात्म्यात चैतन्य निर्माण होते त्यावेळी व्यक्तीच्या मनात विचारांची निर्मिती होत असते. व्यक्ती ज्यावेळी आपल्या भावना व्यक्त करते,त्यास आपण बोलणे असे म्हणतो,  विचारांची अभिव्यक्ती म्हणजेच बोलणे,
भाष्य काराबने होय,असेही डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी सांगितले.आपण ज्या वास्तूत,घरात राहतो, त्या ठिकाणी ज्या प्रकारचे भाष्य होते त्यावरून त्या घरात चांगले - वाईट संस्कार घडतात. त्यासाठी प्रत्येकाने आपली वाणी, भाषा चांगली ठेवण्याचा प्रयत्न करावा,असेही डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर गुरुलिगअप्पा तोडकरी वरदाशंकर तोडकरी मधुकर तोडकरी प्रेमाकर तोडकरी; सौ.लताताई मुद्दे, शिवकांत स्वामी गुरुजी, बालाजी भिगोले यांसह समस्त तोडकरी  परिवारातील  सदस्यांनी परिश्रम घेतले.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

परभणी वासियांचा पुणे येथे डॉ.जगदीश शिंदे आयोजित स्नेहमेळावा-गेट टुगेदर सहभाग नौंदवा

छेपरभणी वासियांचा पुणे येथे डॉ.जगदीश शिंदे आयोजित स्नेहमेळावा-गेट टुगेदर सहभाग नौंदवा

भोसरी / परभणी / पाथरी / सोनपेठ (दर्शन) :-

पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील नोकरी निमित्ताने आलेल्या परभणी, पाथरी येथील भूमिपुत्रांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे. दि. २२ सप्टेंबर १९ रोजी स. ११ वाजता आळंदी येथील सुयश मंगल कार्यालयात  होणार आहे.भविष्यात आपल्याच परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि पुढील पिढयांना बेरोजगारी मुळे स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये याकरिता एकत्र येऊ अशा निर्धाराने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त मूळचे परभणी, पाथरी,मानवत, सोनपेठ,सेलू, जिंतूर,गंगाखेड, पूर्णा व पालम येथील विध्यार्थी,महिला, पुरुष तथा जेष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमास हजर रहावे असे आवाहन आयोजक डॉ जगदीश शिंदे यांनी केले आहे. डॉ. जगदीश शिंदे भोसरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. डॉ. शिंदे पेशाने डॉक्टर असून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. ओंकार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून निशुल्क वृद्धश्रम,सामूहिक विवाह सोहळे,रोजगार मेळावे,मोफत शस्त्रक्रिया, विध्यार्थ्यांसाठी करियर माग्दार्शनाचे कार्यक्रम,आरोग्य तपासणी, शालेय साहित्य वाटप तसेच 200 हुन अधिक आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांना पेरणी साठी बियाण्याचे वाटप  असे अनेक समजयोगी कामे त्यांनी केली असून आता परभणीपासून विस्थापित झालेल्या नागरिकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

Friday, September 20, 2019

सोनपेठ शहरात पुन्हा भुरट्या चोरांचा सुळसुळाट

सोनपेठ शहरात पुन्हा भुरट्या चोरांचा सुळसुळाट
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मुख्य रस्त्यावरील दोन दुकाने फोडून दुकानातील बावन हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल दुकानाचे शटर वाकवून लंपास करण्यात आला, त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातीलस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात रोडवरील पवन किराणा दुकान व सरदार बिअर शॉपी चे शटर तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केल्या मुळे या आदी अशा चोरीच्या घटना घडूनही पोलिस प्रशासनाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.दर सोमवारी आठवडी बाजार असताना भर बाजारातून अनेक मोबाईल चोरी होत असतात या मोबाईलचा पोलीस स्टेशन येथे कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंद होत नसल्यामुळे या मोबाईल चौरांचे फावलेले दिसून येत आहे तसेच काहि दिवसा पुर्वी आठवडी बाजारातुन मोटार सायकल चोरी झाली तीची हि फिर्याद सोनपेठ पोलीस स्टेशनला घेतली नसल्याची माहीती आहे अशा घटनांची फिर्याद घेत नसतील तर कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक मा.कृष्णकांत उपाध्याय यांच्या मो.7720008688 या क्रमांकावर संपर्क साधुन कैफियत मांडावी,
याआधीही अनेक कृषी केंद्र, अनेक पानटपरी, अनेक किराना दुकान येथे चोरांनी असाच लाखो रुपयाचा डल्ला मारलेला असूनही या चोरीतील आरोपी आजतागायत सोनपेठ पोलीस प्रशासनाला मिळून आलेले नाहीत, आजही केवळ दोन नंबरचे अवैध्य धंदे खुलेआमपणे कुणाच्या आशिर्वादाने चालु आहेत असा सवालही जनतेतुन विचारला जात आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण असून लहान मोठे व्यापारी आपल्या दुकानांमध्ये वाचमन अथवा स्वतः सुरक्षा करताना दिसून येत आहेत तरीही पोलीस प्रशासनाची पेट्रोलिंग गाडी कशी आणि कधी आणि केव्हा पेट्रोलिंग करते हा चर्चेचा विषय झाला आहे. या बाबीकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहून तात्काळ या चोरांचा बंदोबस्त करतील का असा सवाल या सर्व लहान मोठ्या व्यापारी वर्गातून विचारला जात आहे.

परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर राजाभाऊ कदम यांच्या वाढदिवसा निमित्ताने दिनांक 21 सप्टेंबर 2019 शनिवार रोजी ठीक दुपारी 1 वाजता कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ येथे "एल.आर.के.टँलेंट सर्च स्पर्धा परीक्षा" तसेच "जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे" आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.आशिषकुमार बिरादार तहसीलदार, प्रमुख उपस्थिती शौकत पठाण गट शिक्षणाधिकारी तसेच प्रमुख पाहुणे गजानन भातलवंडे पोलीस निरीक्षक, डॉ.अमोल जवंजाळ वैद्यकीय अधिकारी,सौ.सोनमताई देशमुख मुख्याधिकारी, सौ.ज्योतीताई शिंदे (कदम) संस्था उपाध्यक्षा, परमेश्वर कदम संस्था अध्यक्ष, बळीराम काटे अध्यक्ष जय भवानी मित्र मंडळ, प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये आदिजन उपस्थित राहणार असून वरील दोन्ही स्पर्धा दोन गटात घेतल्या जाणार आहेत तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक पांडुरंग मस्के, अध्यक्ष परमेश्वर भैय्या मित्र मंडळ, गोविंद साठे, उपाध्यक्ष परमेश्वर भैया मित्र मंडळ तसेच प्राचार्य दत्ता नरहारे कै.राजाभाऊ कदम विद्यालय सोनपेठ यांनी केले आहे.