Thursday, August 29, 2019

क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रम संपन्न

क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रम संपन्न

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील कै.र.व. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आज दि. 29 अॉगस्ट रोजी क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांची जयंती व फिट इंडिया मूवमेंट कार्यक्रमा अंतर्गत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा. डॉ. बालासाहेब काळे, प्रा. डॉ. बापुराव आंधळे, प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये, प्रा. डॉ. आशोकराव जाधव, प्रा. डॉ. संतोष रणखांब व प्रा. गोविंद वाकणकर उपस्थित होते.
शहरातील कै.र.व.महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने युजीसीच्या परिपत्रकानुसार फिट इंडिया मुव्हमेंटचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवाहनानुसार दुरदर्शनवरून प्रसारीत करण्यात आलेला कार्यक्रम दाखवण्यात आला. तसेच 10000 पावले चालण्याचा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना शारीरिक सक्षततेची शपथ देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गोविंद वाकणकर,सुत्रसंचालन क्रीडा समितीचे सदस्य प्रा. डॉ. संतोष रणखांब तर आभार प्रा. डॉ. अशोक जाधव यांनी केले. प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी, प्रा. डॉ. सुनिता टेंगसे, प्राचार्य डॉ. शकिला शेख, बहन मिरादिदी, प्रा. अंगद फाजगे, प्रा. विकास रागोले, प्रा. विशाल राठोड, प्रा.पांडूरंग फले, प्रा. भैय्यासाहेब जाधव, प्रा. पंडित राठोड, प्रा. महालिंग मेहत्रे, प्रा. कैलास आरबाड, प्रा. राहुल साठे यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
              

Wednesday, August 28, 2019

गावरान धक्का येथे एकवचनी राम नव्हे नऊ मुखी रावण यांचाच बोलबाला आहे

गावरान धक्का

येथे एकवचनी राम नव्हे नऊ मुखी रावण यांचाच
बोलबाला आहे

सत्तेसाठी पक्षांतराची
लाट आहे
नीतीची मात्र पूर्णतः
वाट आहे "!!

पक्षांतर हा संधीसाधूंचा
खेळ आहे
येथे फक्त कोडग्यानचाच
मेळ आहे "!!

पक्षांतर हा सत्तेच्या
राजकारणात कलंक नव्हे
सन्मान आहे
येथे एकवचनी राम नव्हे
नऊ मुखी रावण यांचाच
बोलबाला आहे "!!

आनंद कोठडीया
९४०४६९२२००

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्र

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            गुरुवार दि.29 ऑगस्ट 2019 रोजी मंठा फाटा जि.जालना येथून मोटारीने बोर्डीकर मैदान सेलू येथे दुपारी 1.30 वाजता आगमन व महाजनादेश यात्रा जाहीर सभेस उपस्थिती, दुपारी 2.30 वाजता मोटारीने पाथरीकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद मैदान पाथरी येथे आगमन व महाजनादेश यात्रा जाहीर सभेस उपस्थिती, दुपारी 4 वाजता मोटारीने मानवतकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता मानवत येथील नगरपालिका कार्यालयासमोरील चौकात आगमन व महाजनादेश यात्रा स्वागतास उपस्थित, सायंकाळी 5.15 वाजता मोटारीने परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता जिल्हा परिषद कार्यालयाजवळील ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान परभणी येथे आगमन व महाजनादेश यात्रा जाहीर सभेस उपस्थिती, सायंकाळी 7 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 7.05 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम करतील.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
              

शिक्षकांच्या आंदोलनाला यश : विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना २० टक्के अनुदान

शिक्षकांच्या आंदोलनाला यश : विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना २० टक्के अनुदान

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
मागील १८ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे असल्याने राज्य सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांना २० टक्के अनुदान सुरू करण्याचा निर्णय घेतला.विविध मागण्यांसाठी राज्यातील विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकांनी आंदोलनाची हाक दिली होती. मुंबईतील आझाद मैदानावर १८ दिवसांपासून शिक्षकांचे आंदोलन सुरू होते. २० टक्के अनुदान असणाऱ्या शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, मूल्याकंन करण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसह २०१२-१३मधील वर्ग तुकड्यांना १०० टक्के अनुदान द्यावे आदी मागण्या शिक्षकांकडून करण्यात आल्या होत्या.सुरूवातीला आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने एका शिक्षकाने आझाद मैदानावरील झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सोमवारी लाठीमार केला होता. त्यानंतर हे आंदोलन चिघळले होते. शिक्षकांवर झालेल्या लाठी हल्ल्याने शिक्षक आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली घेत मंत्रालयात उपोषण सुरू केले होते. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हे उपोषण मागे घेतले होते. शिक्षक आमदार विक्रम काळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांना पाठिंबा दिला होता.आंदोलन तीव्र होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानाचा निर्णय घेतला. ज्या शाळांना ० टक्के अनुदान होते, त्यांना २० टक्के, तर ज्या शाळांना २० टक्के अनुदान दिले जात होते, त्यांचे अनुदान २० टक्क्यांनी वाढवून ४० टक्क्यांवर नेण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली.विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना२० टक्के अनुदान दिले जाणार आहे. ज्याशाळांना आधी २० टक्के अनुदान दिले गेले होते, त्यांना ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विनाअनुदानित शाळांना ३०४ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरुआहे. मोठ्या प्रमाणात या अनुदानाचा लाभ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होईल, असे आशिष शेलार म्हणाले. दरम्यान, शिक्षण मंत्र्यांनी निर्णय लिखित स्वरुपात हमी दिल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नाही. तोपर्यंत पुन्हा विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेची प्रतीक्षा करु, असे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

Tuesday, August 27, 2019

३० वर्षांपासून ‘तो’ एकाचवेळी करत होता तीन सरकारी नोकऱ्या, असा झाला भांडाफोड

३० वर्षांपासून ‘तो’ एकाचवेळी करत होता तीन सरकारी नोकऱ्या, असा झाला भांडाफोड

बिहार / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

सध्या देशभरामध्ये बेरोजगारी आणि मंदीची चर्चा आहे. नोकरीसाठी भटकणाऱ्यांपैकी प्रत्येकाला आपल्याला सरकारी नोकरी मिळावी असे वाटते. सरकारी नोकरीसाठी अनेकजण वाटेल ते करायला तयार असतात. असे असलेतरी अनेकदा प्रयत्न करुनही अनेकांना सरकारी नोकरी मिळत नाही. पण बिहारमधील एक व्यक्ती मागील ३० वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी तीन सरकारी नोकऱ्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार समोर आल्यानंतर अटकेच्या भितीने ही व्यक्ती फरार झाली आहे.सुरेश राम असे या एकाच वेळी तीन सरकारी कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या इसमाचे नाव आहे. पाटण्यामधील बभौल गावात राहणारा सुरेश हा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये मागील ३० वर्षांपासून तीन वेगवेगळ्या सरकारी पदांवर कार्यरत होता. विशेष म्हणजे मागील तीस वर्षांपासून या व्यक्तीला तीन्ही नोकऱ्यांचा पगार दिला जात आहे. आता हे प्रकरण उघडकीस आल्या नंतरसुरेशला एकाच वेळी तीन नोकऱ्या मिळाल्या कशा याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. किशनगंजमध्ये बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता, बंका तालुक्यातील बेल्हार प्रकल्पामध्ये जलंसंधारण सहाय्यक अभियंता, भीमनगर पूर्व येथील जलसंधारण सहाय्यक अभियंता या तीन पदांवर सुरेश एकाच वेळी काम करत होता.२० फेब्रुवारी १९८८ रोजी पाटण्यातील सार्वजिनिक आणि रस्ते बांधाकाम विभागामध्ये सुरेश कनिष्ठ अभियंतापदावर रुजू झाला. ही त्याची पहिली नोकरी होती. या विभागामध्ये एक वर्ष काम केल्यानंतर २८ जुलै १९८९ रोजी त्याला जलसंधारण विभागातून नोकरीची ऑफर आली. सुरेशने आहे त्या नोकरीचा राजीनामा न देता ही ऑफर स्वीकारली. एकाच वेळेस दोन नोकऱ्या करत असतानाच जलसंधारण विभागानेच त्याला तिसऱ्या नोकरीची ऑफर दिली. सुरेशने हा गोंधळ विभागाला न कळवता तिसरीही नोकरी स्वीकारली. बिहारमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा हिशोब ठेवण्यासाठी सीएफएमएसही नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर सुरेशचा खोटारडेपणा उघड झाला आहे. पगारासाठी या यंत्रणेमध्ये कर्मचाऱ्याचा आधारकार्ड क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक असते. याच अटीमुळे सुरेशचा खोटारडेपणा उघड झाला. काही वर्षांमध्ये सुरेश एकाच वेळी या तिन्ही नोकऱ्यांमधून निवृत्त होणार होता. मात्र नवीन यंत्रणेमुळे आपला भांडाफोड होणार हे लक्षात आल्यानंतर सुरेश फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

गणेशोत्सावानंतर विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता

गणेशोत्सावानंतर विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम असली तरी विधानसभा निवडणुकीची तारखेची उत्सुकताही तेवढीच आहे. ही उत्सुकता लवकरच संपणार आहे, कारण गणेशोत्सवानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणाही गणेश उत्सावानंतरच झाली होती.

सध्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण करणं निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे. म्हणूनच 2019 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कधीही होऊ शकते.

यंदा 2 ते 12 सप्टेंबर या कालावधीत राज्यात गणेशोत्सव आहे. 2 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून 12 सप्टेंबरला अनंत चतुदर्शी आहे. या दिवशी गणेश विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

2014 मध्ये गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. 15 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं होतं आणि 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. यानंतर 31 ऑक्टोबर रोजी सरकारचा शपथविधी झाला होता.

त्यामुळे आता कोणत्या तारखेला मतदान आणि मतमोजणी होणार, आचारसंहिता लागू होणार याची उत्सुकता आहे.

सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

Thursday, August 22, 2019

किसान मानधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारपासून शिबिरे ; प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार शिबिर ; तालुक्यातील अधिका-यांना पर्यवेक्षणाच्या सूचना ; प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी

किसान मानधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारपासून शिबिरे ; प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार शिबिर ; तालुक्यातील अधिका-यांना पर्यवेक्षणाच्या सूचना ; प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी

अमरावती / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

अल्पभूधारक शेतक-यांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळवून देणा-या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी दि. 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान गावोगावी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत 18 ते 40 वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या राज्यातील सर्व अल्पभूधारक व सीमांत शेतक-यांना सहभागी होता येईल. पात्र लाभार्थ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रूपये प्रतिमाह निवृत्तीवेतन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूदही योजनेत आहे.योजनेची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली. मात्र, अद्यापही नोंदणी समाधानकारक नसल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीत लाभार्थी शेतक-यांची शिबिरे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान शिबिर आयोजनाचा आराखडा तयार करावा. महसूल मंडळनिहाय गावांचे नियोजन करून तीन दिवसांत मंडळातील सर्व गावांत शिबिरे घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार, विस्तार अधिकारी यांना दिले आहेत. आपले सरकार सेवा केंद्रावर या तीन दिवसांत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शिबिरे आयोजित करावीत.तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्र काढून पात्र शेतकरी बांधवांना सहभागाचे आवाहन करावे व मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.योजनेतील लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या सेवा केंद्रातील व्हीएलई, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना देऊन गावातील शिबिराची तारीख, वेळ याबाबतची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी.नोंदणीसाठी लागणा-या आधारकार्ड, बँक पासबुक, खातेउतारा (आठ-अ) आदी माहितीही लाभार्थ्यांना आधीच द्यावी. सर्व सेवा केंद्रचालकांना पूर्णवेळ केंद्रावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोंदणीचा फॉर्म छापून घेऊन तो लाभार्थ्यांकडून भरून घेतल्यास एकत्रित माहिती संकलन (Data Entry) करणे सोयीचे होईल. आवश्यकतेनुसार योग्य तो पर्याय वापरावा. या तीन दिवसांत 18 ते 40 वयोगटातील दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र धारण करणा-या जास्तीत जास्त शेतक-यांची नोंदणी होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश श्री. नवाल यांनी दिले आहेत.
प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी
सदर योजनेत प्रत्येक तालुक्यासाठी एक नोडल अधिकारी नेमण्यात आले असून, हे नोडल अधिकारी मोहिमेदरम्यान गावागावांत भेटी देतील.  वरिष्ठ स्तरावरील पर्यवेक्षिय अधिका-यांना तालुके वाटून देण्यात आले आहेत. पर्यवेक्षिय अधिका-यांनी या तीन दिवसांत विविध गावांना भेटी देऊन लाभार्थ्यांची नोंदणी केली जाते किंवा नाही, याची खात्री करावी. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी शिबिराला उपस्थित राहण्याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

                                              

वैज्ञानिक भित्तीपत्रकाचे प्रदर्शन संपन्न

वैज्ञानिक भित्तीपत्रकाचे प्रदर्शन संपन्न

    सोनपेठ येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग व विवेक वाहीनीच्या वतीने हशिप्रमंचे संस्थापक अध्यक्ष कै. राजाभाऊ कदम व अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृती दिन हा 'वैज्ञानिक दृष्टिकोण दिन'च्या निमित्ताने वैज्ञानिक माहीती देणाऱ्या भित्तीपत्रकाचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी अध्यक्ष म्हणून हशिप्रमंच्या उपाध्यक्षा ज्योतीताई कदम तर ऊद्घाटक डॉ. विष्णू राठोड, प्रमुख पाहूणे म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. बालासाहेब काळे, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, दत्ता पवार, पत्रकार गणेश पाटील व  सुभाष सुरवसे, डुबे, प्रा. गोविंद लहाने, डाॅ. मुकुंदराज पाटील, रियाज खान, अब्दूल गणी(ऊर्दू) हे होते.
    शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील विविध प्रकारची बनवून भित्तीपत्रकाचे प्रदर्शन आयोजीत केले होते. यात बी. एस्सी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांबद्दल, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सापांविषयी तर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शरिरातील संस्थाबद्दल भित्तीपत्रके तयार केली होती. या प्रदर्शनास शहरातील महालिंगेश्वर विद्यालय, मुक्तेश्वर विद्यालय, डॉ. झाकिर हुसैन उर्दू विद्यालय, कै. राजाभाऊ कदम विद्यालयांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह भेट दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रास्ताविक प्रा. भैय्यासाहेब जाधव तर आभार प्रा. पांडुरंग फले यांनी मानले.
   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विशाल राठोड, प्रा. गोविंद वाकणकर, प्रा. अंगद फाजगे, विवेक वाहीनीच्या प्रा. डॉ. सुनिता टेंगसे, प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी, प्रा. डॉ. अशोक चव्हाण, प्रा. डॉ. शिवाजी अंभुरे, प्रा. डॉ. शिवाजी वडचकर, प्रा.पवन पांचाळ, प्रा.अंकिता डाके यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Friday, August 16, 2019

"जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यता दिवस व रक्षाबंधन उत्सव साजरे "

"जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यता दिवस व रक्षाबंधन उत्सव साजरे "

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये 15 आॅगस्ट रोजी शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक प्रा. डॉ. मुजांभाऊ धोंडगे, प्रमुख अतिथी म्हणून रामप्रसाद सारडा, राजकुमार अंबुरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्याताई धोंडगे, शाळेचे प्राचार्य.अजय सर, तसेच आदरणीय पालक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख अतिथी रामप्रसाद सारडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर शाळेतील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला, रामप्रसाद सारडा यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करूण गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले.अध्यक्ष समारोपा मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुजांभाऊ धोंडगे यांनी सोनपेठ परीसरातील दर्जेदार शैक्षणिक व्यवस्था पुरविण्यासाठी सदैव कटिबद्ध असण्याचे मत व्यक्त केले.त्यानंतर सोनपेठ शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले, रॅलीदरम्याण देशभक्तीचा आणि देश प्रेमाचा संदेश देणारी कलाकृती विद्यार्थ्यांनी सोनपेठ येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी सादर केला.यामधे भारतीय पायलट अभिनंदन ची सुखरुप देशवापसी, तसेच पुलमावा या ठिकाणी शहिद झालेल्या विरांना आदरांजली म्हणून तो प्रसंग सादर केला.शेवटी रक्षाबंधाचा उत्सव जवानांना राखी बांधून साजरा करण्यात आला. पुढील फेरी ढोलताशाच्या गजरात पार पाडली. विद्यार्थ्यांचा उत्साह आनंद वर्धक होता.यावेळी सर्व शिक्षक, शिक्षीका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी अथक परीश्रम घेतले.

Thursday, August 15, 2019

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परभणी दौरा कहि खुशी कहि गम

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परभणी दौरा कहि खुशी कहि गम
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परभणी दौरा फायनल झालाय. 28 ऑगस्ट रोजी सेलू पाथरी मानवत परभणी अशा ठिकाणी फडणवीस यांची यात्रा पोहोचते आहे.देवेंद्र फडणवीस यांचा परभणी येथे मुक्काम आहे. विशेष म्हणजे ते कोणत्याही नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या घरी जाणार नाहीत कोणत्याही हॉटेलला थांबणार नाहीत तर शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम राहणार असल्याचे सांगितले जाते. म्हणुन कहि खुशी कहि गम असे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे आपल्या निवासस्थानी घेऊन मुख्यमंत्र्यांनी चहापान करावे जमले तर भोजनही करावे असा अनेकांनी प्रयत्न करून पाहिला. परंतु मुख्यमंत्र्यांनी यात्रेचे स्वरूप लक्षात घेता कोणत्याही नेत्याच्या घरी न जाण्याचा निर्णय घेतला....।।
भारतीय जनता पक्षाला परभणी जिल्ह्यात बळ देण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरेल. प्रामुख्याने पाथरी परभणी जिंतूर आणि गंगाखेड या चार विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असले तरी अद्यापर्यंत गंगाखेड मतदार संघातील एका विजयानंतर कोणत्याही विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला तेवढेच महत्त्व प्राप्त झाले असून भारतीय जनता पक्षाचे कोणते उमेदवार सरस ठरते. याचा आढावा या यात्रेच्या निमित्ताने करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वास्तविक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती असली तरीदेखील परभणी पाथरी गंगाखेड आणि जिंतूर या चारही विधानसभा मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवारांची मोठी यादी आहे. प्रत्येकाला ही संधी निर्माण झाली आहे. परंतु या संधीचे सोने कोण करते यावरही बरेच काही अवलंबून आहे.आता नाही तर कधीच नाही या वाक्या नुसार इच्छुक उमेदवारांनी आपली फिल्डिंग जोरात लावली परंतु नशिब आणि प्रयत्न कोणाच्या बाजूला सरस ठरतील हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरेल. पाथरी विधानसभा मतदार संघात अपक्ष आमदार मोहन फड यांचे नाव चर्चेत आहे फड यांच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षातील मानवत अनंत गोलाईत, सोनपेठ शिवाजी मव्हाळे अशी नावे चर्चेत आहेत तर माजी जील्हा अध्यक्ष पी.डी.पाटिल यांनी मा.ना.नितीन गडकरी यांच्या कडे तिकिटाची मागणी केलेली आहे असे बोलल्या जाते. परंतु फड हे अपक्ष म्हणून लढतात की भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारतात याचा अद्याप उलगडा झाला नाही, जिंतूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर त्यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांच्यासह काही नावे समोर येत आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघात महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांचे नाव आघाडीवर आहे भरोसे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राहुल पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी भरोसे यांनी प्रयत्न जारी केले आहेत.गंगाखेड विधानसभा मतदारसंघात अनेक नावे समोर आली असून माजी आमदार विजयराव गव्हाणे, गणेश राव रोकडे, रामप्रभू मुंढे, डाँ.सुभाष कदम यांच्या शिवाय अनेक नावे चर्चिली जात आहेत.अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाची परभणी जिल्ह्यातील वाढलेली ताकद लक्षात घेता आणि सरकारचे निर्णय या जमेच्या बाजू असल्या तरी इच्छुक उमेदवारांनी कशा पद्धतीने प्रचाराची आखणी केली हे महत्त्वाचे ठरेल.भारतीय जनता पक्षाला मोठी संधी चालून आली आहे.परंतु सहयोगी पक्षाला देखील तेवढीच मदत करावी लागणार आहे.भारतीय जनता पक्षाला कोणत्या ठिकाणी उमेदवार देता येईल आणि निवडून आणता येईल याची चाचपणी देखील यात्रेत होईल मुख्यमंत्री फडणवीस स्वतः विधानसभानिहाय अधिक माहिती घेतील आणि त्यावर निर्णय होईल असे सांगितले जाते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल का हाही प्रश्न महत्त्वाचा ठरेल. युती नाही झाली तर चारही विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचे यावरही खलबते होऊ शकतात. एकंदरीतच सेलू पाथरी आणि परभणी येथील होत असलेल्या जाहीर सभा महत्त्वाच्या ठरू शकतात.या सभांना कितपत प्रतिसाद मिळतो या सभेतून नेमक्या कोणत्या समस्या सोडवल्या जातात.यावरही बरेच काही अवलंबून आहे.