श्री महालिंगेश्वर विद्यालयाच्या माझी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन वर्ग भरला तेवीस वर्षानंतर
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयात इसवी सन 1996 यावर्षी इयत्ता दहावी वर्गात असणाऱ्या एकूण 90 विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा नुकताच पार पडला.शहरातील नामांकित कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय येथे 23 वर्षांनंतर अतिशय हर्षोउल्हासत संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी शामराव मोहरीर, नंदकुमार स्वामी, ज्ञानोबा गव्हाणे, वसंत चिलवंत,पंढरीनाथ जोशी तत्कालिन परिचर रविंद्र शेटे, सुधाकर तांदळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीमाई व महात्मा फुले यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.यानंतर दिवंगत सौ.श्रीदेवी माणिकराव निलंगे मॅडम व इतर मयतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यानंतर माझी विद्यार्थ्यांनी सर्वच मान्यवरांचा सत्कार 'एक झाड एक पुस्तक' देऊन केला.23 वर्षापूर्वीच्या आठवणीत रंगलेले सर्व विद्यार्थी त्यांच्या त्या वेळच्या शिक्षकांसह आनंदी दिसून आले. प्रत्येक मुलगा वर्गात असताना पुढे काय होईल?असं त्यांच्या गुरुजींनाही वाटलं नव्हतं.हेच विद्यार्थी आज याच वर्गातील विद्यार्थी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कर्तव्य बजावत आहेत. यावेळी त्यांचे शिक्षकही या स्नेहमीलन मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,जीवनामध्ये शिक्षणाशिवाय आपल्या उद्धाराचे दुसरे कोणतेच साधन नाही. उत्तम शिक्षण वर्तनात आणल्यास आपले जीवनमान आनंदी बनवेल. या शिक्षणामुळे स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचे कुटुंब उभा करता आले. त्यानंतर सामाजिक जाणिवेच्या भावनेतून समाजातील गरजू व्यक्तींना ही मदत करता येते. माणसाने आयुष्यभर सतत शिकलं पाहिजे.आपल्या प्रगतीचा मार्ग ही आपल्या वर्गमित्रांत व्यक्त केला. कदाचित येणाऱ्या पिढीलाही आपला संघर्ष जीवनाची नवी वाट दाखवेल असेही अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त होताना सांगितले.याच वर्ग मित्रातील अनेक जण आज समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, कुणी वाहन निरीक्षक,कुणी शिक्षक, कुणी व्यापार क्षेत्रात, कुणी शैक्षणिक क्षेत्रात तर शेतीमध्ये नावलौकिक मिळवून आनंदी आयुष्य जगत आहेत. आपल्या वाट्याला आलेला संघर्ष येणाऱ्या पिढीला येऊ नये. म्हणून आज जमलेली 23 वर्षानंतर एकत्र आलेली ही मुलं त्यांच्या शिक्षकांसमोर संघर्ष कहानी सांगत होते.या माझी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमाप्रसंगी सर्वांच्यावतीने ग्रंथवाचन चळवळ,सोनपेठ यांना ग्रंथदान करण्यात आले. वर्गमित्र महेश जाधव (ग्रंथवाचन चळवळ, उपाध्यक्ष) यांनी ग्रंथदान स्वीकारले. या वर्गमित्रांच्यावतीने त्यांची वर्गमैत्रिण कौसा राठोड हिच्यासाठी एक हात मदतीचा म्हणून आर्थिक मदत करण्याचेही ठरवण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता पवार तर आभार प्रदर्शन संदिप रेड्डी यांनी केले.याप्रसंगी प्रमुख परमेश्वर कदम, अशोक जाधव, शिवराज राऊत, शिवप्रसाद तापडिया,केदार वलसेटवार, निवृत्ती गव्हाणे, अनंता सोलापूरकर व सर्व माझी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन हे स्नेहमिलन 23 वर्षाने घडवून आणले.
No comments:
Post a Comment