सोनपेठ पोलिसांच्या निषेधार्थ सोनपेठ बंद सोनपेठ बंद सोनपेठ बंद व्यापारी महासंघाची सोनपेठ बंदची हाक
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ व्यापारी महासंघाच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर 2019 बुधवार रोजी शहरातील वाढत्या चोरीच्या कारणांनी किराणा दुकान, कृषी केंद्र, पानपट्टी, घरगुती, बियर बार असे अनेक दुकान व घरगुती चोरांनी फोडून लाखो रुपये नगदी व मालावर डल्ला मारणारे भुरटे चोर आज पर्यंत सापडले नाहीत परंतु खुलैआम अवैद्य धंदे चालू असून अवैध्य वाहतुक, रेती तस्कर, क्लब चालक, मटका बुक्की वाले सटर, फटर लोकांनकडूण चिरीमिरी खायला परभणी जिल्ह्यात सोनपेठ पोलिसांचा हात कोणी धरू शकत नाही अनेक ग्रामीण भागात पत्ते खेळताना लोक पकडले परंतु शहरात अनेक ठिकाणी पत्ते खेळणारे पोलिसांना दिसत नाहीत, मेन लोक सोडुन हमाली कामगारावर गुन्हे दाखल करतात, आठवडी बाजारात अनेकांची मोबाईल चोरीला गेली परंतु फिर्याद हरवल्याची तक्रार दाखल होते, तसेच रोरांच्या उलट्या बोंबा प्रमाणे चौकशी पचंनाम्या साठि आलेले पोलिस फिर्यादीलाच उलट सुलट प्रश्न विचारुन मगरुरीची भाषा वापरुन मेल्याहुन हि मैल्यासारखे फिर्यादी यास वाटते कि आपनच चोर आहोत का? तरी सय्यम दाखवतो. एकूणच सोनपेठ शहरातील व्यापारी, नागरीक, महिला असुरक्षित वाटू लागल्याने सोनपेठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे असून विश्वास राहिला नसल्याची भावना अनेकांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केली तसेच कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची लवकरच व्यापारी महासंघाचे शिष्टमंडळ भेट घेऊन दाद मागणार असल्याचे यावेळी सांगितली याच कारणांनी अकार्यक्षम सोनपेठ पोलिसांच्या निषेधार्थ उद्या दिनांक 3 ऑक्टोबर वार गुरुवार रोजी सोनपेठ बंदचे निवेदन व्यापारी महासंघाच्या वतीने दिले आहे.
सोनपेठ परीसरातील बातम्या व दिपावली 2019 कविता, विशेष लेख आणि आपल्या छोटयाशा जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment