नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातील प्रकार ; अघोरी इंजेक्शन देऊन रुग्णाच्या जीवितास खेळ सुरू
व्यसनमुक्तीच्या नावाखाली आर्थीक लुबाडणुक
अंबाजोगाई / सोनपेठ (दर्शन) :-
अंबाजोगाई तालुक्यातील कारखाना परिसरामध्ये लातूर रोडवर सुरु असलेल्या वाघाळा जवळील एका संस्थेद्वारे चालवले जाणारे नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसन सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णावर आघोरी पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन देऊन रुग्णाच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार बिनदिक्कीतपणे सुरू आहे.या गंभीर बाबींकडे अरोग्य विभाने लक्ष देण्याची गरज असून यासंदर्भात दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी सोनपेठ तालुक्यातील एका रुग्णाच्या नातेवाईकाने ग्रामीण पोलीस ठाणे आंबेजोगाई येथे एक तक्रार दाखल केली आहे. या गंभीर प्रकाराने संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई येथील लातूर रोडवरील वाघाळा परिसरामध्ये नवजीवन व्यसन मुक्ती केंद्र नावाने राजकुमार गवळे व अंजली पाटील यांचे एक व्यसनमुक्ती केंद्र मागील अनेक वर्षापासून सुरु आहे.या व्यसन मुक्ती केंद्राला कोणी मान्यता दिली,कोनाच्या देखरेखीखाली ते चालते,याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला? या बाबतीत अद्याप साशंकता वर्तवीली जात आहे.तर आजपर्यंत व्यसनमुक्ती केंद्रांमधून दारू सोडण्यासाठी आलेल्या कित्येक रुग्णांना नियम बाह्य पणे कुठले तरी त्याच्या सरळ मेंदूवर दुष्परिनाम होणारे अघोरी इंजेक्शन दिले जाते व इंजेक्शन देतात रुग्ण घरी गेल्यापासून दोन दिवसांनी डोके जड पडणे, काहीच न आठवणे, वेड्यासारखे वागणे, झोप न येणे, मान, हात, पाय, तोंड आधी अवयव वाकडे होणे,बेचैन व अस्वस्थ वाटने,अत्महात्येचे विचार येणे यासारखे गंभीर आजार सुरु होतात. व आजार सुरू होताच त्या रुग्णांना परत आमच्याकडेच पुढील ६ महिन्यांसाठी अॕडमिट केल्यानंतर बरे करता येते असा सल्ला नातेवाईकाला दिला जातो. अशा रुग्णावर पुढील वर्षभर उपचार करून त्यांच्या कडून लाखो रुपये वसूल केले जातात.या प्रकारातून आजपर्यंत आनेकांचे जिवन संपले आसल्याचे सांगीतले जात आहे. असाच काही प्रकार गर्जे नामक रुग्णावर व्यसन सोडविण्याच्या नावाखाली दि.२२ ऑक्टोंबर रोजी राजकुमार गवळे यांनी केला असून त्याच्या दिलेल्या आघोरी इंजेक्शनमुळे गर्जे या २३ वर्षे वयाच्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे.त्याच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. परंतु स्वतः पेशाने लॅब टेक्नीशियन असलेला आणि पॅथॉलॉजी लॅब चालविणारा मुलगा आज वेड्यासारखे चाळे करू लागल्याने व हात पाय वाकडे होऊन त्याची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे त्याचे वडील पत्रकार बाबासाहेब गर्जे यांनी ३१ ऑक्टोंबर रोजी अंबाजोगाई येथे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये नवजीवन व्यसन मुक्ती केंद्र चालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस तपास करत असून या व्यसनमुक्ती केंद्राकडून व्यसन सोडविण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या अघोरी कृत्यामुळे व रुग्णावर होणाऱ्या दुष्परिणामांतून त्यांच्याकडून पुन्हा लाखो रुपयांची लुबाडणूक करत असलेल्या व्यसन मुक्ती केंद्रावर पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग ,धर्मादाय आयुक्त काय कारवाई करणार ? याकडे संपुर्ण बिड जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे.
No comments:
Post a Comment