विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 निवडणूक निरीक्षकांनी साधला पत्रकारांशी संवाद
परभणी / सोनपेठ (दर्शन ) :-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ सुरळीतरित्या पार पाडावी यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ९५-जिंतूर व ९६- प रभणी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून भुपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ९७-गंगाखेड व ९८-पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून विजय केतन उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी पत्र्कारांशी प्रत्यक्ष संवाद साधून निवडणूक विषयी काही तक्रारीसाठी सावली विश्रामगृह येथे सायंकाळी ४ ते ५ या वेळेत संपर्क साधावा. अशी माहिती दिली. श्री.सिंग हे सावली विश्रामगृहात वर्षा कक्षात थांबले असून त्यांचा मोबाईल नं. ७४४८२२८२१२ व ई मेल आयडी obgen9596@gmail.com असा आहे.
श्री.उपाध्याय हे वसंत कक्षात थांबले असून त्यांचा मोबाईल क्र. ९६२३९१९९५९ व ई-मेल आयडीobgen97ggk98pathri@gmail.com असा आहे. अशी माहिती त्यांनी पत्रकारांना यावेळी दिली.
No comments:
Post a Comment