“राष्ट्रवादीच्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं, त्यामुळे काॅंग्रेस-राष्ट्रवादीला 10-10 जागा मिळणार”
जालना | राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह असलेल्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं वाजली आहेत, त्यामुळे मोठा भाऊ आणि छोटा भाऊ दोघेही 10-10 जागा जिंकतील, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली उडवली आहे.
नरेंद्र मोदी प्रचारासाठी जालन्यात आले आहेत. यावेळी सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत चांगलाच धक्का मिळेल, असंही मोदींनी म्हटलं आहे.
370 वरुन विरोधकांनी केलेल्या टीकेवरही नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे. मला विरोधक विचारतात 370 चा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संबंध काय? विरोधक आता शेजारी राष्ट्राची भाषा बोलत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत.
No comments:
Post a Comment