Friday, October 4, 2019

रस्ता नाही तर पाथरी विधानसभेला मतदानही नाही - मंचक त्रिंबकराव चांदवडे


रस्ता नाही तर पाथरी विधानसभेला मतदानही नाही - मंचक त्रिंबकराव चांदवडे

सोनपेठ (दर्शन) :-

देश स्वतंत्र झाला पण आमचा गोदाकाठ पारतंत्र्यात आहे अस आम्ही मानतो. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुका एक तर सर्व सुविधा पासुन अति मागास आहे, आज ही गोदाकाठ चे थडी उक्कडगाव, लासीना, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, लोहिग्राम, गोळेगाव इतर गावे आज ही सुविधा च्या प्रतिक्षेत आहेत. हे सर्व गावे रस्त्या पासुन वंचित आहेत. कित्येक वर्षांपासून या नागरिकांची एकच मागणी आहे, की आम्हाला किमान तालुक्याला जाण्यासाठी रस्ता द्यावा परंतु कित्येक आमदार खासदारांनी नुसती अश्वासनाची खैरात केली परंतु आज पर्यंत कोणत्याच नेत्यांनी रस्त्याचा प्रश्न सोडला नाही. गावात कुणी आजारी पडला तर त्याला दवाखान्यात घेऊन जाता येत नाही, लहान मुलांना रस्त्या अभावी शिक्षणा पासुन वंचित राहावे लागत आहे. शेळगाव ते थडी उक्कडगाव हा रस्ता झाला पण तो एकाच वर्षात उखडून गेला. त्या रस्त्यावर दोन नद्या असल्यामुळे त्यावर पुल बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे च गोदाकाठ च्या सर्व नागरिकांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडनुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सदर गावांचा रस्त्याचा प्रश्न शासनाने त्वरीत सोडवावा अन्यथा रस्त्यापासून वंचित नागरिकांचा उद्रेक होउन उग्र आंदोलन करण्यात येईल.

मंचकआप्पा त्रिंबकराव चांदवडे
थडी उक्कडगाव ता. सोनपेठ

सोनपेठ परीसरातील बातम्या व दिपावली 2019 कविता, विशेष लेख आणि आपल्या छोटयाशा जाहिराती साठि सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment