कै.रा.गां.महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी प्रा.बालाजी शिंदे यांची नियुक्ती
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील कै.राजीव गांधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. बालाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दि.5 ऑक्टोबर 2019 शनिवार रोजी दुपारी 1 वाजता झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.शिवाजीराव मव्हाळे यांनी पुष्पहार घालून प्रा. बालाजी शिंदे यांना पदनियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रसंगी बोलताना मा.शिवाजीराव मव्हाळे म्हणाले की प्रा. बालाजी शिंदे यांनी महाविद्यालयासाठी केलेले कार्य आणि त्यांचा मन मिळावू स्वभाव याची दखल घेऊन, संस्थेने या पदासाठी त्यांची निवड केली आहे. ही जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडतील याचा विश्वास असून,भावी वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देतो'
या वेळी सहकारी प्रा.शिवाजी पवार,प्रा.सुमेध कांबळे, प्रा.नर्गिस शेख, प्रा.चंद्रशेखर किरवले, लयब्रियन रेखा कांबळे, वरिष्ठ लिपिक दिक्षा शिरसाठ, लॅब असिस्टंट कैलास भालेराव, श्वेता चव्हाण, यांनीही प्रा.बालाजी शिंदे यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास मोरताटे यांनी केले.शेवटी विठ्ठल भारती यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment