Sunday, October 6, 2019

श्री नंदिकेश्वर मठ संस्थान अंतर्गत प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी नवरात्र व विजयादशमी चे आयोजन

श्री नंदिकेश्वर मठ संस्थान अंतर्गत प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी नवरात्र व विजयादशमी चे आयोजन
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ संस्थान अंतर्गत प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी नवरात्र व विजयादशमी चे  आयोजन करण्यात आले असून यामध्ये नवरात्रीच्या प्रारंभा पासून ते विजयादशमी पर्यंत मठाधिपती श्रीगुरु 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे मौनवृत्त अनुष्ठान करण्यात येते.तसेच यावेळी नवरात्रि निमित्ताने दुर्गा मातेची स्थापना केली आहे.याप्रसंगी सकाळी आरती व प्रसादाचे वाटप होते, यानंतर सप्तश्रृंगी देवीचे पारायण केले जाते.दुपारी पंचक्रोशीतील विविध ठिकानचे यामध्ये गंगाखेड, शेळगाव, अंबाजोगाई, पठाण मांडवा, बर्दापुर व इतर ठिकाणावरुन आलेल्या भक्तां मार्फत संगीत भजन केले जाते.रात्री देवीची आरती होऊन भक्तांना प्रसादाचे वाटप केले जाते.फक्त महिलांसाठी गरबा व दांडीयाचे आयोजन केले होते.तसेच आष्ठमी च्या दिवशी सकाळी आरती प्रसाद,दुपारी पारायण व कालिका देवीचे पुजन करुन भजन होऊन दुपारी 4 वाजता होम पूजन होते.विजयादशमी दिवशी सर्व विधी कार्य होऊन संपूर्ण सोनपेठ शहरातील भाविक भक्त एकत्र येऊन नंदिकेश्वर महाराजांची पालखी सांयकाळी संपुर्ण गावामध्ये मिरवून सिमाल्लोंघन केले जाते. याची सांगता नंदिकेश्वर महाराजांच्या संजिवनी समाधी येथे होते. अशा विविध कार्यक्रमाने विजयादशमी उत्सव मठ संस्थान अंतर्गत साजरा करण्यात येतो.

No comments:

Post a Comment