राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी कै.र.व.क.महा.च्या दोन मुलीचीं निवड
सोनपेठ (दर्शन) :-
कै र.व.क.महाविद्यालयाच्या मुलीच्यां १९ वर्षांखालील संघाने राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेच्या चाचणी साठि मुलींच्या संघाच्या शालेय विभागीय कबड्डी स्पर्धा ९ आँक्टोबर २०१९ रोजी बीड जिल्हातील आष्टी तालुक्यातील जामगाव येथे संपन्न झाल्या या स्पर्धतील संघात महाविद्यालयाच्या १) सिमा गोविंद राठोड २) कल्पना रघुनाथ चव्हाण ३) विद्या भगवान पवार या तिन मुलींचा सहभाग होता परंतु १) सिमा गोविंद राठोड व २) कल्पना रघुनाथ चव्हाण या दोन मुलीची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे याचे पत्र जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय बीड यांनी दिले आहे या निवड बद्दल ह शि प्र मंडळाचे अध्यक्ष मा.परमेश्वर कदम, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार,शैलेन्द्रसिंह गौतम, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण, तालुका क्रिडा संयोजक गुलाब कदम,प्राचार्या शेख शकिला, क्रिडा संचालक प्रा.वाकणकर जी बी, डॉ.मुकुंदराज पाटील, प्रा.कैलास आरबाड, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मराठी पत्रकार परीषद अध्यक्ष सर्व पत्रकार सदस्य, सा.सोनपेठ दर्शन संपादक व परीवाराच्या वतिने, खेळाडूनी तसेच सर्व स्तरातुन अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment