Thursday, October 17, 2019

जिल्‍हयात 19 ते 21 ऑक्‍टोबर दरम्‍यान ; प्रतिबंधात्‍मक आदेश लागू

जिल्‍हयात 19 ते 21 ऑक्‍टोबर दरम्‍यान ; प्रतिबंधात्‍मक आदेश लागू

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्‍हयात विविध पक्ष्‍, संघटना यांचे उमेदवार, प्रतिनिधी, कार्यकर्ते यांना सभा, बैठका, प्रचार,प्रसार करण्‍यास निवडणूक प्रचाराची मुदत संपल्‍यापासून म्‍हणजेच दिनांक 19 ऑक्‍टोबर 2019 रोजी सायंकाळी 6 वाजल्‍यापासून दिनांक 21 ऑक्‍टोबर 2019 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम १४४ अन्‍वये  प्रतिबंध घालण्‍यात येत आहेत.

जिल्‍हयातील विधानसभा मतदार संघातील ९५-जिंतूर,  ९६-परभणी,९७-गंगाखेड, ९८-पाथरी या विधानसभा मतदार संघात लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम १९५१ चे कलम १२६ च्‍या तरतुदीनुसार मतदान बंद होण्‍याच्‍या वेळेपासून ४८ तास अगोदर संबंधित मतदार संघात प्रचाराचा कालावधी संपणार आहे. मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्‍यक्‍ती व प्रचारा करीता आलेले स्‍टार प्रचारक हे कायदयानुसार निर्धारीत निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्‍यानंतर विधानसभा मतदार संघात राहील्‍यास त्‍यांचे कडून प्रचार मोहिम राबविली जाण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

फौजदारी प्र‍क्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्‍वये प्राप्‍त अधिकारा नुसार जिल्‍हयातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्‍यक्‍ती व प्रचाराकीरता आलेले स्‍टार प्रचारक यांना परभणी जिल्‍हयाचे सिमेत उपस्थित राहण्‍यास मनाई करणे आवश्‍यक आहे. तसेच प्रचाराचीमुदत संपल्‍यानंतर मतदारांच्‍या गाठी भेटी घेऊन त्‍याना आकर्षित करण्‍यासाठी  रोख रक्‍कम भेट वस्‍तू दारु या सारख्‍या विविध प्रलोभणाद्वारे मतदाराना आकर्षित करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

हे आदेश निवडणूकीचे कामे हाताळताना आणि कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्‍हणून दिनांक 19 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी 6 वाजलेपासून अंमलात येईल. तसेच प्रत्‍येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्‍य नसल्‍याने हे एकतर्फी आदेश ध्‍वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्‍यास प्रसिध्‍दी द्यावी असे जिल्‍हाधिकारी पी. शिवशंकर यांनी आदेशित केले आहे.

No comments:

Post a Comment