विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत बनावे - सोनमताई देशमुख
सोनपेठ (दर्शन) :-
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त शहरात करण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता दुत बनावे असे अवाहन मुख्याधिकारी सोनमताई देशमुख यांनी केले.शहरातील कै.र.व.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागामार्फत "स्वच्छता अभियान जनजागृती कार्यक्रमाचे"आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य शकीला शेख या उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मा.सोनमताई देशमुख या होत्या.त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना घर परिसर स्वच्छते बरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे भान आपण नेहमी ठेवले पाहिजे,प्लास्टिकचा वापर टाळून येणाऱ्या भावी पिढयांची सुरक्षा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे म्हणून विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत व्हावे असे आवाहन केले. प्रा.डॉ.मारुती कच्छवे यांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी याबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली याप्रसंगी विचार मंचावर नगरपरिषद कर्मचारी दिवाण, संदिप पोरे, प्रा.डॉ.संतोष रणखांब, प्रा.सुरेश मोरे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुनीता टेंगसे यांनी केले तर आभार प्रा.अंगद फाजगे यांनी मांनले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Tuesday, October 1, 2019
विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत बनावे - सोनमताई देशमुख
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment