बोरीत रा. काँ.चा माजी उपसरपंच विजयकुमार चौधरी यांच्या घरावर धाड ; निवडणूक भरारी पथक व पोलिसांची संयुक्त कार्यवाही
बोरी / सोनपेठ (दर्शन) :-
बोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपसरपंच विजयकुमार चौधरी यांच्या घरावर निवडणूक भरारी पथक व पोलिसांनी एकत्रितरित्या शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी धाड टाकली. निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख एस एस मोगरकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही करण्यात आली.याप्रसंगी पोलिसांनी विजयकुमार चौधरी यांच्या घरातून देशी दारूच्या १० पेट्या, क्रिकेटचे ४ किट, ७९ टी शर्ट व इतर साहित्य जप्त केले. या कार्यवाहीत पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक सुभाष मारकड, एस एस गिरी, के जी पतंगे, एस बी कटारे, महिला पोलिस कर्मचारी गवळी, सिसोदिया, राठोड, क्षिरसागर तसेच निवडणूक विभागाचे मगर, एन एम काळे, विष्णू गिरी यांचा समावेश होता.
No comments:
Post a Comment