विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हयात एकुण २८ उमेदवारांची माघार ५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये ९८- पाथरी- मतदारसंघातील एकुण १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून एकुण १० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. ९५-जिंतूर- एकुण १७ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून १३ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. ९६-परभणी – मतदारसंघातील एकुण २७ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली असून १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
९७-गंगाखेड- मतदारसंघातील एकुण २३ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून एकुण १५ उमेदवार निवडणूकलढविणार आहेत.जिल्ह्यातील ४ मतदारसंघात एकुण ८१ पैकी ५३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
No comments:
Post a Comment