विधानसभा सार्वत्रीक निवडणूक-२०१९ ; जिल्ह्यातील चार मतदारसंघात सरासरी ६७.८८ टक्के मतदान ;•मतमोजणी २४ ऑक्टोबरला
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्ह्यातील चार मतदारसंघात एकुण सरासरी मतदान ६७.८८ टक्के एवढे झाले आहे. यामध्ये ९५-जिंतूर विधानसभा मतदारसंघात ७२.८८ टक्के, ९६-परभणी विधानसभा मतदारसंघात ६२.२१ टक्के मतदान, ९७-गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ६९.०१ टक्के मतदान तर ९८-पाथरी मतदारसंघात ६६.५९ टक्के मतदान झाले आहे. चार मतदारसंघासाठीची मतमोजणी दि.२४ ऑक्टोबर २०१९ रोजी होणार आहे.
९५-जिंतूर मतदारसंघात ३ लाख ५० हजार ८३४ एवढे मतदार होते त्यापैकी २ लाख ५५ हजार ६८७ मतदारांनी मतदान केले यामध्ये १ लाख ३५ हजार ४९३ पुरुष, १ लाख २० हजार १९३ महिला व १ इतर यांचा समावेश आहे. ९६-परभणी मतदारसंघामध्ये एकुण ३ लाख ६ हजार २९९ एवढ्या मतदारापैकी १ लाख ९० हजार ५४० मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २हजार ६४० पुरुष व ८७ हजार ९०० महिला मतदारांचा समावेश आहे. ९७-गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकुण ३ लाख ८८ हजार ६६२ एवढया मतदारांपैकी २ लाख ६८ हजार २२० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामध्ये १ लाख ४२ हजार ९५३ पुरुष व १ लाख २५ हजार २६७ महिला यांचा समावेश आहे. तसेच ९८-पाथरी विधानसभा मतदारसंघात एकुण ३ लाख ५३ हजार ७६७ मतदारांपैकी २ लाख ३५ हजार ५८४ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २६ हजार ११० पुरुष तर १ लाख ९ हजार ४७४ महिला यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment