Friday, July 12, 2019

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी यांच्याकडून जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.15 ते 20 जुलै 2019 या कालावधीत करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यास हजर राहुन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
          परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.15 व 16 जुलै 2019 रोजी, मानवत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.17 व 18 जुलै रोजी आणि सोनपेठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.19 व 20 जुलै रोजी  सकाळी 11.30 वाजता  रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात एसआयएस इंडिया लिमिटेड हैद्राबाद, नवभारत फर्टिलायझर नागपुर, धुत ट्रान्समिशन औरंगाबाद, पियाजो कंपनी बारामती, कॅप्टन ट्रेनिंग सेंटर व ग्लोबल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट औरंगाबाद, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यलवत, यशस्वी ग्रुप चिंचवड पुणे, एलआयसी ऑफ इंडिया या नामांकित कंपन्याचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहून रिक्त पदाकरीता उमेदवारांची भरती करणार आहेत. तरी उमेदवारांनी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो व बायोडाटासह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र.02452220074 वर संपर्क साधावा. असे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांनी कळविले आहे.

आपले हक्काचे साप्ताहिक सोनपेठ दर्शन
संपादक किरन स्वामी मो.9823547752.
बातम्या व जाहीराती साठी संपर्क साधा.

1 comment:

  1. योग्य मार्गदर्शन किरण जी

    ReplyDelete