Tuesday, July 30, 2019

पाथरी विधान सभेतील मंचकराव बचाटे पाटलांची लोकउमेवारी भल्या भल्याना धडकी भरवणारी ठरेल

पाथरी विधान सभेतील मंचकराव बचाटे पाटलांची लोकउमेवारी भल्या भल्याना धडकी भरवणारी ठरेल

सार्वजनिक जिवनामध्ये माणुस म्हणून आपल्या कर्तव्याचे निर्वाह करत असतांना आपल्या सामाजिक,धार्मिक,अध्यात्मिक,कौटोंबीक व राष्ट्रीय  कर्तव्य व जबाबदार्‍या पार पाडणे आता थोडे कठिण होऊ लागले आहे. कारण मी माझे घर,माझी पत्नी व मुले म्हणजे माझा देश अस माणणार्‍या आत्मकेंद्रीत न होणार्‍या स्वकेंद्रीत राहणार्‍या वर्गाची वाढ आता झपाट्याने होत आहे.सर्व समावेशक भारतीय समाज हा शब्द लोकांना आता जुना वाटू लागला आहे. मी म्हणजे मी जन्माला आलेली जातच त्या पलिकडे मी व माझी जात म्हणजेच सर्वश्रेष्ठ इतर जातींची सतत अवहेना करणे म्हणजे आपण समाजामध्ये किती वजनदार आहोत असा भास निर्माण करणारी पिढी झपाट्याने वाढत आहे.
आपले जीवनमान उंचावत असतांना शेजारी पाजारी तर सोडाच नातेवाईकांनाही ढूंकून न बघणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे.आई बाबा म्हणजेच एक ओझे असे समजून गावाकडच्या जुन्या वाड्यामध्ये त्यांना खितपत ठेवणारी पिढी आता वाढू लागली आहे.आईच्या हातची मऊ-मऊ दुध पोळी खाणारी पिढी लयाला जाऊन आता पिझ्झा-बर्गर खाणारी पिढी वाढू लागली आहे. इंग्रज मालकांची इंग्रजी भाषेतली पप्पा-मम्मी माय-बापाच्या थोबाडीत मारु लागली आहे. धर्म म्हणजे निवडणुकांपुरता नाते-गोते, जात-पात, पोटजात-उपजात असे नानाविध प्रकारांना निवडणुकींच्या काळामध्ये रंग रंगोटी करण्यात येते. एके काळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अनोळखी इसम अथवा व्यक्ती गावात आली तर गावच्या पाटल्याच्या वाड्यावर हातात गुळाचा खडा व वंजळभर शेंगदाणे आणि तांब्या भरुन ताक पहिले त्याच्या पुढ्यात ठेवण्यात यायच म्हणून पाटील म्हणजे त्या गावचा पालक होता.हजारो वर्षापासून गावच्या आठरा पगड समाजाला सामाजिक,धार्मिक, कौटोंबीक सोहळ्यांमध्ये कुटूंबाचे सदस्य म्हणून सहभागी करुन घेणारा पाटीलच. गावच्या बारा बलुतेदारांच्या लेकी बाळींची सोयरिक पाटील स्वत; आपल्या वाड्यावर करुन द्यायचे. मुलगी भांडून घरी परत आली तर पाटलाच्या वाड्यावरची बैलगाडी त्या मुलाच्या घरी जायची त्याची समजूत काढायची. आपल्या पोटच्या गोळ्यागत ज्या वर्गाने आठरा पगड समाजाची जोपासणुक केली तो पाटीलकीचा वारसा या वारस्याने हजारो वर्ष देशाला सर्वोत्तम योध्दे दिले.आत्मबलिदान करणार्‍या पिढ्या आपल्या घरातच निर्माण केल्या. स्वातंत्र्यानंतर भारताने प्रजासत्ताक पध्दतीचा अंगिकार केला.मत स्वातंत्र्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीने गावच्या पोलीस पाटील म्हणजे निळू ङ्गुले सारखा असले चित्र उभे करुन भारतीय संस्कृतीचे कंबरडे मोडले. पाटीलकी मोडीस काढणार्‍या वर्गाने पुढे गावातली तालीम नष्ट केली. पाटीलकीच्या आश्रयाला असलेली तालीम ही उत्तम आरोग्य,बल संवर्धन, चारित्र्य निर्मीती गाव म्हणजे मेरा गाव मेरा देश या वचनाने प्रत्येक तालिमीमध्ये महाबली हनुमानाच्या साक्षीने राष्ट्र घडवणारी पिढी तयार व्हायची. समाज घडवणार्‍यामध्ये गाव पातळीवर पाटील,पटवारी,मुख्याध्यापक यांची ङ्गार मोठी मोलाची भूमीका होती. या भूमीकेपासून आधूनिकीकरणाच्या नावाखाली ङ्गारकत घेणार्‍या राज्य व्यवस्थेला गावच्या घराघरामध्ये भांडण लावून गावपातळीवर असलेले बंधुत्व संपवून नव्या जातीवादी व्यवस्थेला जन्म द्यायचा होता म्हणून एकेकाळी गावात कुणी दारु पिऊन आलाच आणि त्या दारुड्या समोर मी पाटलाला जाऊन सांगतो अस कोणी म्हणाला तरी दारुडे उसात जाऊन लपायचे हि नैतिक भिती मुल्यांकित समाजाची निर्मीती करणारी होती.मराठवाडा तर संतांची भूमी वारकरी संप्रदायाचा आत्माच मराठवाड्यात राहतो. मराठवाड्यातली माणसं ही सृजनशिल,आध्यात्मिक व परोपकारी आहेत. परंतू मागच्या 10 वर्षाच्या सार्वजनिक निवडणुकांमधून त्यांच्यामध्ये भेद निर्माण करत जातीपातीचे विष पेरण्याचे काम कुणी तरी करत आहे. परंतू समाजात पसरत असलेली अव्यवस्था आळस आणि एैतखाऊ पणा यांच्या एैशवर्यातून गलिच्छ राजकारणाची निर्मीती होते.त्यामुळे लक्ष्मीपुत्र धनाड्य लोकांची वर्णी लोकसभा व विधानसभेला लागत आहे.हे चित्र भयावह भविष्याची भिती निर्माण करत आहे. लोकशाहीचा जुवा खेळणार्‍या जुगार्‍यांना आता धडकी भरायला लावणार वारकरी संप्रदायात जन्माला आलेल,आयुष्यभर यशस्वीरित्या पोलिस खात्यात निष्कलंक नौकरी करत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याचे बाळकडू त्यांना पारंपारिक पाटीलकीच्या वाड्यावर जन्मानेच मिळाले होते.सामाजिक जबाबदारीचे भान आणि जाण आई वडीलांनी बालपणीच करुन दिले होते. वडील मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील विख्यांत किर्तनकार, दिंडी क्र.5 चे विणेकरी ज्ञानेश्‍वर माऊलींच्या सोहळ्यात आयुष्याची 50 वर्ष अखंड अनवाणी पायाने सेवा करणारे श्री ह.भ.प.सागरराव भिवराव बचाटे पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव श्री.मंचकराव सागरराव बचाटे पाटील(मुळ गाव वडगाव स्टे ता.सोनपेठ) हे आपल्या वडीलांचा समाजिक,धार्मिक व सांस्कृतीक वारसा अंगिकारुन आज घडीला सेवा निवृतीच्या नंतर समाजसेवाला वाहून घेतले आहे. त्यांच्या आप्तस्वकीयापासून विरोधकांमध्ये सुध्दा पाथरी विधानसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणून मोठ्या आशेने नाव चर्चिल्या जात आहे. हल्ली इव्हेंटमॅनेजमेंटचा जमाना आहे. मुंबई पुण्यात राहणारी माणस परभणी जिल्ह्याला राजकीय कुरण समजुन पैशाच्या जोरावर राजकीय पक्षाची उमेवारी मिळवत लोकप्रतिनिधी होऊ पहात आहेत. परंतू भूमीपुत्रांची  होत असलेली सततची अवहेलना व विश्‍वच माझे घर असे समजणार्‍या वारकरी संप्रदायाचे वारसदार मंचकराव बचाटे पाटील हे सर्वच जातीधर्माच्या धामिर्क भिंतीपलिकडे माणुस म्हणून माणुसकीचा धर्म जोपासणारे एक आर्दश व्यक्तीमत्व म्हणून सर्वांच्याच पसंतीस उतरत असून ग्रामीण भागामध्ये गावा गावात नातेवाईक आप्तस्वकीय सर्वच धर्मातील त्याचा व्यापक मित्रपरिवार यांनी श्री.मंचकराव बचाटे पाटील यांचा संभाव्य उमेदवार म्हणून प्रचारही सुरु केला आहे. मतदार संघातील लोक आता अशीही चर्चा करत आहेत की, पैशाच्या बळावर निवडणुन येणार्‍यांनी धंदा म्हणून पद स्वत:साठीच वापरले आम्हाला गावात जायला रस्ता नाही,स्वच्छ पाणी नाही,शेतात वीज नाही, पोलीस स्टेशनला आमचे कोणी एैत नाही, तहसीलला सातबारा मिळत नाही त्यामुळे आम्हाला कोणी वाली उरला नाही पण श्री.मंचकराव बचाटे पाटील या भूमीपुत्राच्या रुपाने 2019 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी मध्ये लोकांचा उमेदवार म्हणून आम्ही त्यांना उभ करु त्यासाठी लागणारा निधी म्हणून लोकवर्गणीतून उभारु व मातीचा स्वाभीमान, संस्कृतीची जाण,मानवधर्माच ज्ञान,भागवत धर्माची पताका आणि वारकरी संप्रदायाच वैभव जोपासणार्‍या लोक उमेदवार श्री.मंचकराव बचाटे पाटील यांना उमेदवारीची भाषा पाथरी विधान सभेतील बहुतांश गावामध्ये होऊ लागली आहे. या गोष्टीची कानोकान खबर न लागू देता गोपनिय संघटन बांधणी चालू आहे. धनाड्य उमेवाराविरुध्द हा गनिमीकावा येणार्‍या निवडणुक पाथरी विधानसभेत अचंबीत करणारा आहे.यावरुन पाथरी विधान सभेचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे. हे सांगणे न लागे. तसेच या लोक उमेदवाराला कोणता पक्ष गळ घालतो व त्यांना उमेदवारी देत पाथरी विधानसभा मतदार संघातील लोकांचा सन्मान करतो हे पहाने यासाठी काही काळ वाट पहावी लागेल. परंतू एक गोष्ट नक्की ‘‘यह परभणी है मेरी जान‘‘ बनी तो बनी नही तो भल्या भल्या साठी सदा भनभनी’’
लेखन :- प्रकाशराजे साळवे (जील्हा प्रतिनीधी,परभणी)

No comments:

Post a Comment