Thursday, July 4, 2019

प्रलंबित सर्व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनेचा लाभ द्या ! कामगार आयुक्त यांचे आदेश ! एम.डि.ओ.सघटनेच्या आंदोलनामुळे व वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला आखेर यश !

प्रलंबित सर्व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनेचा लाभ द्या ! कामगार आयुक्त यांचे आदेश ! एम.डि.ओ.सघटनेच्या आंदोलनामुळे व वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला आखेर यश !
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथील सरकारी कामगार कार्यालय कडून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व कल्याणकारी लाभ योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे कामगारांच्या न्याय हक्काचे प्रलंबित कल्याणकारी सर्व योजना लाभ कामगारांना न दिल्यामुळे  मायनोरेटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन परभणीच्या कडून दि.२४ जून २०१६ रोजी पासून पुन्हा   आंदोलन सुरु करत असल्याबाबत  मुंबई आणि यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते या याप्रकरणी कामगार आयुक्तांनी या गंभीर बाबींची दखल घेत  कामगार आयुक्तांनी एका पत्राद्वारे संबंधित कार्यालयात असे नमूद केले आहे की कार्यालयास महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई व आपल्या कार्यालयास वेळोवेळी पत्र व्यवहार करुन नोंदित बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ वाटप करण्याबाबत विनंती केलेली आहे मायनोरेटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन परभणी यांच्या संदर्भय पत्राची प्रत सोबत पाठविण्यात येत आहे आपल्या कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या सर्व लाभाच्या अर्जाचे लवकरात लवकर छाननी करुन देय लाभ नोंदित बांधकाम कामगारांना अदा करण्यात यावेत ज्या नोंदित बांधकाम कामगारानेलाभ मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जात त्रुटी असतील तर सदर त्रुटी संबंधित अर्जदाराला कळवून पूर्तता करण्याबाबत कळवावे .तसेच यज्ञज्या नोंदित बांधकाम कामगाराने सादर केलेल्या लाभाच्या अर्जाच्या छाननी अंती सदर अर्जदार लाभ देण्यास अपात्र असल्यास , अपात्रतेबाबतचे कारण नमूद करुन संबंधित लाभार्थ्यांना कळविण्यात यावे .आपल्या कार्यालयाकडे प्रलंबित असलेले सर्व अर्ज १० जूलै २०१९ पूर्वी निकाली काढून तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा . असे पत्राद्वारे चु ;श्रीरंगम   सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आदेश पत्राद्वारे संबंधित  सरकारी कामगार अधिकारी कार्यालय परभणी यांना कळविण्यात आले आहे जर या संबंधित कार्यालयाने या  सर्व कल्याणकारी योजनांचा आयुक्तांनी दिलेल्या मुदतीच्या आत वाटप करण्यात आले नाही तर पुन्हा बांधकाम कामगाराच्या न्याय हक्कासाठी या कार्यालय विरुद्ध मोठा लढा देण्यात येईल असे एम.डि.ओ.संघटनेचे. महाराष्ट्र सचिव मेहबूब खान पठाण जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर उपाध्यक्ष शेक उस्मान तालुका अध्यक्ष गणी सर्व पदाधिकारी यांनी कळविले आहे.

आपले हक्काचे साप्ताहिक सोनपेठ दर्शन
संपादक किरन रमेश स्वामी मो.9823547752.
बातम्या व जाहिराती साठि सदैव आपलाच

No comments:

Post a Comment