Thursday, July 18, 2019

माझ्या वाढदिवसावर वायफळ खर्च नको, तो पैसा मुख्यमंत्री सहायता निधीला द्या!'

 'माझ्या वाढदिवसावर वायफळ खर्च नको, तो पैसा मुख्यमंत्री सहायता निधीला द्या!'

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलैला वाढदिवस आहे. या दिवशी ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावू इच्छिणाऱ्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना, फुलांचे मोठमोठे गुच्छ पाठवू इच्छिणाऱ्या मंडळींना फडणवीस यांनी एक नम्र आवाहन केलं आहे.'लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी माझा वाढदिवस बडेजाव, गाजावाजा करत साजरा करू नये. वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग, बॅनर्स, जाहिराती दिसणार नाहीत, याची प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी. जल्लोषाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत.  माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या कुणाला खर्च करण्याची इच्छा असेल त्यांनी तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान म्हणून द्यावा', असं पत्रकच मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढलं आहे. त्यातून त्यांची सामाजिक जाणीव आणि साधेपणा सहज दिसून येतो.

No comments:

Post a Comment