Monday, July 22, 2019

सोनपेठ येथे सपोनि उस्मान शेख यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या मटक्यासह अवैध्य धंदे कायम


सोनपेठ येथे सपोनि उस्मान शेख यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या मटक्यासह अवैध्य धंदे कायम

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथे मागील काही महिन्या पासुन कल्याण व मुंबई नावाचा मटका जुगार व इतर अवैध्य धंदे शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कायम सुरू आहेत.कधी नव्हे ते सोनपेठकरांना माहित नसलेला हा मटका नव्याने रुजू तत्कालीन सपोनि उस्मान शेख यांच्या कार्यकाळात सुरू झाला व बघता बघता मटक्याला आज सुगीचे दिवस प्राप्त झाले. त्यातच उस्मान शेख यांची बदली झाली परंतू शहरासह तालुक्यात मटक्याची धग अजुनही सतत सुरू आहे या मटक्यामूळे अणेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त होताना दिसत आहेत,हे अवैध्य धंदे बंद असताना मुला मुलींना घरो-घरी खाऊ जात असत आता व्यसनाधीण बाप व मुला मुलींना विनाकारण मार भेटत आहे, वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन शहरासह तालुक्यात सुरू असलेला कल्याण व मुंबई नावाचा मटका व इतर अवैध्य धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी येथील सुजान नागरिकातून करण्यात येत आहे.शहरातील पोलिसांना माहिती असलेल्या विविध भागांमध्ये दिवसभर खेळला जाणारा कल्याण व रात्रीचा मुंबई नावाचा मटका तेजित सतत सुरू आहे शहरांमध्ये यापूर्वी मटका खेळणारांचे प्रमाण कमी होते तालुक्यातील हा खेळ खेळणारे नागरिक मटका खेळण्यासाठी पुर्वी इतरत्र जात असत परंतु मागील चार महिन्यापूर्वी शहरात मटका सुरू करण्यात आला आज रोजी शहरांमध्ये 15 ते 20 ठिकाणी मटका घेणारे आहेत तर दोन ठिकाणी मटक्याचे बुक्की धारक आहेत हा मटक्याचा खेळ खेळविणारावर स्थानिक पोलिस प्रशासन वचक न ठेवता आर्थिक जुमला जमवत आहेत.त्यामुळे मटका घेणारांना स्थानिक पोलिसांचे पाठबळ मिळत आहे परंतु तालुक्यातील विविध ग्रामीण भागातून येणारे नागरिक एक रुपयाचे नव्वद रुपये होतील या भाबड्या आशेने मटका खेळत आहेत शहरासह ग्रामीण भागातील अनेक नागरिक मटका या खेळाकडे आकर्षित होऊन स्वतःचे संसार उध्वस्त करून घेत आहेत यामध्ये ग्रामीण भागातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.शहरात सुरू असलेल्या मटक्या बद्दल स्थानिक पोलिस प्रशासनाकडून गरज पडल्यास ठरवून देऊन कारवाई केली जाते प्रत्येक महिन्याला एका मटका धारकांवर कारवाई करून वरिष्ठांची मने जिंकली जातात व पोलिसांनी मटक्यावर धाड मारली असल्याचा मोठा गाजावाजा केला जातो परंतु ही कारवाई ठराविक मटका धारकांवर पूर्व सूचना देऊन दोघांच्या सहमतीनेच केली जाते व पुढे मटक्याचा व्यवसाय दोघांच्या सलोख्याने तेजीत ठेवला जातो अशी चर्चा आहे या गंभीर बाबीकडे कर्तव्यदक्ष असणारे परभणी जिल्हा पोलिस अध्यक्ष कृष्णकांत उपाध्याय यांनी लक्ष दिल्यास शहरासह तालुक्यातील मटका व इतर अवैध्य धंदे बंद होऊ शकतात व त्यातून उद्ध्वस्त होणारे अनेक गोरगरिबांचे संसार पुन्हा उभा ठाकतील तसेच पुन्हा घरो-घरी मुला मुलींना खाऊ हि जाईल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment