वसंतराव नाईक यांची जयंती व वृक्ष दिंडी वृक्षारोपनासह उत्साहात साजरी
सोनपेठ (दर्शन ) :-
सोनपेठ शहरातील नवाजलेल्या व्हिजन पब्लिक स्कूल व विश्वभारती प्रायमरी स्कूल येथे दि.1 जुलै रोजी कृषीरत्न वसंतराव नाईक यांची जयंती तसेच वृक्षारोपन व वृक्ष दिंडी चे आयोजन करण्यात आले होते. यात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे व शाळेचे व्यवस्थापक भगवान घाटुळ व मुख्याध्यापक रामेश्वर हुंबे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश जाधव, बळीराम काटे,सतप्रितसिंग शाहू, नितेश लष्करे आदीजन उपस्थित होते. यावेळी प्रथम वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्या बद्दल प्रल्हाद निर्मळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर 3 जुलै रोजी वृक्ष दिंडी काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना एक झाड देऊन यांच्या सह जोरदार घोषणा देत शहरातील आठवडी बाजार, प्रमुख मार्गाने भव्य दिव्य वृक्ष दिंडी काढण्यात आली.आंबेडकर चौकात सर्व मुलांना व मुलींना गोल बसवून श्रीमती गित्ते मॅडम व श्रीमती सुनीता मॅडम यांनी बसवलेली "वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन" या विषयावर नाटिका दाखवण्यात आली यावेळी या ठिकाणी बहुसंखेने लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला व सर्व विद्यार्थ्यांचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक रविकुमार स्वामी, सूरज गायकवाड, शिंदे सर व सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या हक्काचा मानुस सा.सोनपेठ दर्शन
संपादक किरन रमेश स्वामी बातम्या व जाहिराती साठी
संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment