Tuesday, July 9, 2019

हे काम केलं नाही तर 20 कोटी लोकांची पॅन कार्ड होणार रद्द

हे काम केलं नाही तर 20 कोटी लोकांची पॅन कार्ड होणार रद्द

मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

तुम्ही तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं आहे का? जर तुम्ही हे केलं नसेल तर तुमचं पॅन कार्ड रद्द होऊ शकतं.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठीची डेडलाइन 30 सप्टेंबर 2019 पर्यंत आहे. डेडलाइनच्या आधी पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केलं नाही तर इनकम टॅक्सच्या नियमांनुसार ते कार्ड अवैध मानलं जाईल.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड असं करा लिंक

सगळ्यात पहिल्यांदा इनकम टॅक्स विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या इफायलिंग वेबसाइटवर जा. इथे डाव्या बाजूला लाल रंगातल्या 'लिंक आधार' यावर क्लिक करा.

तुमचं अकाउंट नसेल तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करा. लॉग इन केल्यानंतर पेज उघडेल. त्यावर दिसणाऱ्या ब्लू स्ट्रिपमध्ये प्रोफाइल सेटिंग निवडा.

प्रोफाइल सेटिंगमध्ये आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिसेल. तो सिलेक्ट करा. इथे दिलेल्या सेक्शनमध्ये तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड भरा. ही माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या 'लिंक आधार' ऑप्शनवर क्लिक करा.

मोबाइलवरूनही करा लिंक

तुम्ही यासाठी एसएमएस वर आधारित सेवाही वापरून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता. 567678 किंवा 56161 या नंबरवर एसएमएस करून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकता.

देशभरात 43 कोटी लोकांकडे पॅन कार्ड आहेत तर 120 कोटी लोकांकडे आधार कार्ड आहेत. ज्यांना 31 जुलै 2019 पर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरायचे आहेत त्यांच्यासाठी तर पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करणं महत्त्वाचं आहे. हे केलेलं नसेल तर ते इनकम टॅक्स रिटर्न भरू शकत नाहीत.

हे काम करण्यासाठीची मुदत मोदी सरकारने सहा वेळा वाढवली आहे. याआधी यासाठी 31 मार्चची मुदत देण्यात आली होती. आता ही डेडलाइन 30 सप्टेंबर 2019 झाली आहे.

आपला हक्काचा मानूस संपादक किरन स्वामी
जगात जर्मनी भारतात परभणी जील्ह्यातिल एकमेव रोखठोक साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment