बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाला यश ; मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृहला प्रशासकीय मान्यता
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यात मागासवर्गीय मुलींसाठी विभागीयस्तरावर ७ आणि जिल्हा व तालुकास्तरातवर ४३ अशी एकूण ५० ठिकाणी मागासवर्गीय मुलीसाठी नवीन शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.बबनराव लोणीकर यांनी सांगितले.पुढे बोलतांना मंत्री श्री. बबनराव लोणीकर म्हणाले की,जालना जिल्ह्यात मौजे आंबा ता.परतूर येथे मुलींचे शासकीय वसतिगृह मंजूर व्हावे, यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला. यात ७ वसतिगृह हे २५० क्षमतेची विभागस्तरावरील व ४३ वसतिगृह १०० क्षमतेची तालुकास्तरावरील आहेत.तसेच शासकीय वसतिगृहांच्या इमारत बांधकामासाठी रुपये १०.०० कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला असून त्यास प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली आहे. मुलींसाठीची सर्व शासकीय वसतिगृहे हे सुसज्ज अशा शासकीय इमारतीमध्ये कार्यरत करण्याचा शासनाचा मानस आहे.तसेच एकही मुलगी शाळाबाह्य राहू नये,तसेच शाळेतील मुलींची होणारी गळती थांबे असा विश्वास श्री.लोणीकर यांनी व्यक्त केला.
आपल्या हक्काचा माणूस संपादक किरन स्वामी
साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठि जगात जर्मनी भारतात परभणी जील्ह्यातिल एकमेव रोखठोक साप्ताहिक
संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment